बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुस्लिम आरक्षणामुळे ओबीसी, मराठा आरक्षण धोक्यात येईल- देवेंद्र फडणवीस

मुंबई | मुस्लीम आरक्षणाबाबत उच्च न्यायालयाने जे मान्य केलं आहे ते लक्षात घेऊन राज्यात लवकरात लवकर मुस्लीम आरक्षण देण्याबाबत अध्यादेश काढून कायदा करु आणि निर्णय घेऊ, असं अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक म्हणाले आहेत. यावर विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

धर्माच्या आधारावर आरक्षण देता येणार नाही. इतकंच नाही तर धर्माच्या आधारावर मुस्लिम आरक्षण दिल्याने मराठी आणि ओबीसी आरक्षणही अडचणीत येईल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

मुस्लिम समाजाच्या आरक्षणाला शिवसेनेची सहमती आहे, असं नवाब मलिक यांनी सांगितलं. पण बाबासाहेबांच्या घटनेनुसार धर्माच्या नावावर आरक्षण देता येणार नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

दरम्यान, सरकार बनवताना शिवसेनेनं आपली विचारधारा सोडून काय काय मॅनेज केलंय याची माहिती द्यायला हवी. अशा प्रकारच्या आरक्षणामुळे मराठा आरक्षणही धोक्यात येऊ शकतं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

ट्रेंडिंग बातम्या- 

आवडता खासदार कोण?; सुप्रिया सुळेंनी सांगितलं भाजपच्या ‘या’ खासदाराचं नाव

राज्यसभेसाठी भाजपकडून ‘या’ नावावर शिक्कामोर्तब!

महत्वाच्या बातम्या-

नगरसेवक पद रद्द केल्यानंतर श्रीपाद छिंदमची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला…

सर्वसामान्यांप्रमाणे मंत्री बच्चू कडूंनी केला लोकलनं प्रवास!

उस्मानाबादमध्ये द्राक्ष बागा उद्ध्वस्त करणाऱ्या टोळीचा हैदोस!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More