महाराष्ट्र मुंबई विधानसभा निवडणूक 2019

शिवसेनेला पाठिंबा देऊ नका मुस्लिम गटाचं थेट सोनिया गांधींना पत्र

शिर्डी | महाराष्ट्रातल्या जनतेने कोणत्याही पक्षाला बहुमत दिलेलं नाही. त्यामुळे 2 किंवा 3 पक्षांना एकत्र येत सत्तास्थापन करावी लागेल. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस एकत्र येत सत्ता स्थापन करतील, अशी एक शक्यता आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिर्डीतल्या एका मुस्लिम गटाने काँग्रेसच्या हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांना पत्र लिहीलं आहे.

शिवसेनेशी हातमिळवणी करणं म्हणजे जातीयवादी पक्षाशी आघाडी करणं, असं म्हणत जर शिवसेनेशी काँग्रेसची आघाडी झाली तर इतकी वर्ष काँग्रेसच्या पाठिशी असणाारा मुस्लिम मतदार दुरावेल, असं मत या गटाने सोनिया यांना लिहीलेल्या पत्रात मांडलं आहे.

काही दिवसांपूर्वी काँग्रेसचे राज्यसभा खासदार यांनी भाजपच्या आणि शिवसेनेच्या हिंदुत्वात  फरक आहे. त्यामुळे काँग्रेसने शिवसेनेला पाठिंबा देण्याला मुस्लिम समाजाचा पाठिंबा आहे, त्यामुळे शिवसेनेसोबत जाण्याविषयी विचार करू असं म्हटलं होतं. त्यानंतर आता मुस्लि समाजातल्या एका गटाचा या आघाडीला विरोध असल्याचं दिसतंय.

या पत्रानंतर हुसेन दलवाईंनी सोनिया गांधींची भेट घेत मुस्लिम समाजाचा शिवसेनेसोबतच्या आघाडीला विरोध नसल्याचं सांगितलं. त्यामुळे सोनिया गांधी आता निर्णय घेतात हे पाहणं महत्वाचं आहे.

 

 

महत्वाच्या बातम्या-

 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या