बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

जात पात विसरत मुस्लिम तरूणांनी हिंदू महिलेला दिला खांदा

नवी दिल्ली | कोरोनाकाळात परके सोडाच आपले रक्ताचेसुद्धा आपल्याला दूर लोटत आहेत. जिच्या पोटचा गोळा आहे तोच जर आपल्या आईच्या मृत्यु झाल्याचं समजल्यावर पळून जात असेल तर याच्यापेक्षा दुर्दैव्य काय म्हणावं. त्यानंतर त्या मातेचे अंतिमसंस्कार मुस्लिम तरूणांनी केले. एकीकडे माणुसकीचं दर्शन घडताना दिसत आहे तर दुसरीकडे रक्ताची नाती पाठ फिरवत आहेत.

बिहारमधील चंपारण जिल्ह्यातील राणीगंज पंचायतीच्या तेतरिया गावात दिग्विजय प्रसाद यांची 58 वर्षांची पत्नी पार्वती देवी कित्येक महिन्यांपासून आजारी होत्या. रूग्णालयात दाखल केलं त्यानंतर त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. त्यांच्या चाचणीचा निकाल हा नकारात्मक आला. मात्र त्यांना घरी आणत असताना त्यांचा मृत्यु झाला. यावेळी त्यांच्या जवळ असलेला मुलगा आणि जवळील लोक भीतीने घाबरले आणि कोरोना संक्रमणामुळे त्यांना मरणाची भीती वाटू लागली.

काही वेळानंतरही जेव्हा मयत महिलेला कोणीही घराबाहेर पडलं नाही तेव्हा मुस्लिम समाजातील लोकांनी मृत महिलेच्या मुलाकडे मदत मागितली मात्र त्याने त्यांना नकार कळवला. त्यानंतर मुस्लिम समुदायातील मो. रफिक, मो कलाम, मो ललित, मो लादेन आणि मो शरीक पुढे आले आणि आधी तिरडी बांधली त्यानंतर वृद्ध महिलेला अंघोळ घातली आणि त्यांच्यावर हिंदू प्रथांनुसार अंतिम संस्कार केले.

दरम्यान, महिलेच्या मृत्यूनंतर अशी अवस्था झाली की लोकांनी त्यांच्या घराचे दरवाजे बंद केले. प्रत्येकाला वाटलं की महिला कोरोनामुळे मरण पावली आहे. म्हणून कोणीही त्यांचे अंत्यसंस्कार करण्यासाठी पुढे आले नाही. त्यानंतर महिलेच्या इतर नातेवाईकांना विचारात घेऊन आम्ही तयारी करायला सुरूवात केली. एखाद्याने धर्माच्या आधारे भेदभाव करू नये, अशी प्रतिक्रिया मो. रफिक यांनी दिली.

थोडक्यात बातम्या- 

महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय घट, जाणुन घ्या आकडेवारी एका क्लिकवर

केवळ दोन रुपयांसाठी अंध भिकाऱ्यावर धारदार शस्त्राने हल्ला; माणुसकीला काळीमा फासणारी घटना

मुंबई-पुण्यातून राज्यातील इतर जिल्ह्यात धावणाऱ्या ‘या’ रेल्वेगाड्या 10 मे पर्यंत रद्द

“देवेंद्र फडणवीस नागपुरात ठाण मांडून बसले म्हणूनच तिथला कोरोना आटोक्यात आला”

दिलासादायक! पुण्यातील कोरोनाग्रस्तांच्या आकडेवारीत मोठी घट

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More