बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुस्लिम लोकांची अवस्था लग्नाच्या वरातीतल्या बॅंड बाजासारखी झालीये- असदुद्दीन ओवैसी

नवी दिल्ली | एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी सतत आपल्या वक्तव्यामुळे चर्चेत असतात. ओवैसी नेहमीच मुस्लिम समुदायाचे प्रश्न परखडपणे मांडताना दिसतात. अशातच आता ओवैसींनी पुन्हा एकदा मुस्लिमांचा केवळ आपल्या हितासाठी वापर करुन घेणाऱ्या राजकीय पक्षांवर घणाघात केला आहे. उत्तर प्रदेशमधील एका कार्यक्रमात ते बोलत होते.

मुस्लिमांची अवस्था लग्नाच्या वरातीतील बॅंड बाजा पार्टीसारखी झाली आहे. लग्नाच्या वरातीत ज्याप्रमाणे अगोदर त्यांना संगीत वाजवायला सांगितलं जातं आणि नंतर बाहेर उभं केलं जातं, असंच काहीसं मुस्लिमांसोबत घडत आहे, असा घणाघात ओवैसींनी यावेळी केला आहे.

तसेच यावेळी ओवैसी म्हणाले की, मुस्लिम लोक आता कोणतंही वाद्य वाजवणार नाहीत. प्रत्येक जातीकडे आपापला नेता आहे. परंतु मुस्लिमांकडे त्यांचा कोणताही नेता नाही. उत्तर प्रदेशमध्येच 19 टक्के मुस्लिम लोकसंख्या असून एकही नेता नाही.

दरम्यान, उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुका अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर ओवैसी यांनी अयोध्येतून त्यांनी प्रचारसभेला सुरुवात केली आहे. याच प्रचारसभेत बोलताना त्यांनी विरोधकांना खडेबोल सुनावले आहेत.

थोडक्यात बातम्या –

मोठी बातमी! शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसुळांना ईडीनं ताब्यात घेतलं

मुंबईत विनामास्क फिरणाऱ्यांकडून आतापर्यंत वसूल करण्यात आला ‘इतक्या’ कोटींचा दंड

प्रत्येक भारतीयाला मिळणार हेल्थ कार्ड, पंतप्रधान मोदी करणार आयुष्मान डिजिटल मिशनचा प्रारंभ

विदर्भ-मराठवाड्याच्या बुलेट ट्रेनसाठी मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र, म्हणाले…

तीन कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांची आज ‘भारत बंद’ची हाक!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More