बीड | मराठा आरक्षणाच्या आंदोलनात मुस्लीम मराठ्यांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरले आहेत. मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात हे चित्र पहायला मिळत आहे.
बीड जिल्ह्यातील वडवणी येथे मराठा क्रांती ठोक मोर्चामध्ये मुस्लीम समाजाच्या वतीने मराठा बांधवांसाठी चहा आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आली. मुस्लीम समाजाच्या या सहकार्यामुळे मराठे सुखावलेले पहायला मिळाले.
दरम्यान, अशा प्रकारचं चित्र पहिल्यांदाच पहायला मिळालेलं नाही. मराठा क्रांती मूक मोर्चावेळीही मुस्लीम बांधव मराठा बांधवांच्या खांद्याला खांदा लावून मैदानात उतरले होते.
वडवणी जि बीड मधील #मराठा_क्रांति_ठोक_मोर्चा मध्ये #मुस्लिम समाजाच्या वतीने पाणी व चहाची व्यवस्था करण्यात आली होती त्या बद्दल सकळ #मराठा समाजाच्या वतीने जाहिर आभार.🙏@marathart_07 @Maratha_Nashik @MarathaOrg @RtMarathaKranti @MarathaMuktiMor @rafistrim @sunny_gade @jjbhoyar pic.twitter.com/LTiOEPmOYj
— अतुल…!!!💕 (@ItsAtulJadhav) July 26, 2018
महत्त्वाच्या बातम्या–
-मनसे आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा!
-मराठा आरक्षणासाठी दिल्लीत खासदार एकवटले!
-मराठा आरक्षणासाठी आणखी एका शिवसेना आमदाराचा राजीनामा!
-2 दिवसात सरकार मराठा आरक्षणावर योग्य हालचाल करेल- नारायण राणे
-माजी क्रिकेटपटू इम्रान खान पाकिस्तानचे नवे पंतप्रधान?