बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“बंटी-बबली माझं काहीही वाकडं करु शकत नाहीत”

ठाणे | गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि काँग्रेसचे नेते मुझफ्फर हुसेन (Muzaffar Hussain) यांच्यात सध्या शाब्दिक वाद रंगत असताना दिसत आहे. जितेंद्र आव्हाडांनी एका सभेत बोलताना मुझफ्फर हुसेन यांचं नाव न घेता त्यांचा उल्लेख सुलतान-ए-आझम व सुलतान-ए-नया नगर करत सल्तनत खालसा करणार असल्याचे आव्हान केले होते.

आव्हाडांच्या जाहीर वक्तव्यानंतर मुझफ्फर हुसेन यांनी जितेंद्र आव्हाडांचा खरपूस समाचार घेतला आहे. मला सुलतान-ए-आझम म्हणत माझी सल्तनत खालसा करणार असल्याचं म्हटलं होतं पण मी सांगू इच्छितो की सुलतान-ए-हिंद अजमोर शरीफ यांचे छायाछत्र माझ्यावर असताना हे बंटी-बबली माझं काहीही वाकडं करू शकणार नाहीत, असा घणाघात हुसेन यांनी केला आहे.

एकीकडे मित्रपक्षाच्या नेत्याविरोधात बोलायचं आणि दुसरीकडे काँग्रेस (Congress) आणि महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरूद्ध बोलत नाही म्हणायचं, असा टोला हुसेन यांनी लगावला आहे. तर स्व:ताचा इलाका मोठा आहे असं मोठमोठ्याने ओरडून सांगतात आणि शहरात येऊन त्यांना एका भागातील 12 जागाच दिसतात, असा चिमटाही मुझफ्फर हुसेन यांनी काढला आहे.

भाजपला पराभूत करायला एकत्र येऊन पालिका निवडणूक लढवली पाहिजे, धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन नको असं म्हणतात आणि एकिकडे 12 नगरसेवकांना पाडायची भाषा करतात. यावरून बंटी-बबलीच कन्फ्यूज आहेत किंवा लोकांना असं कन्फ्यूज करून भाजपला (BJP) फायदा करून देण्याचा यांचा हेतू हसावा, असा खोचक टोलाही मुझफ्फर हुसेन यांनी लगावला आहे.

थोडक्यात बातम्या-

कंगना राणावतच्या अडचणीत वाढ; ‘ते’ वादग्रस्त वक्तव्य भोवलं, आता…

“हे आंदोलन त्यांनी उभा केलंय, आता निर्णय देखील त्यांनीच घ्यावा”

नवाब मलिकांना मोठा दणका! मुंबई उच्च न्यायालयाने दिली ‘ही’ सूचना

‘या’ जिल्ह्यांनी देशाची चिंता वाढवली; कोरोना रुग्णांची धक्कादायक आकडेवारी समोर

“या सर्वांना जबाबदार कोण? मोदी सरकार पूर्ण नापास”; भाजप खासदाराचे खडे बोल

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More