बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘…यामुळे बॉलिवूड नेहमीच शिक्षा भोगत आलं आहे’, ड्रग्ज प्रकरणात जावेद अख्तर यांचं मोठं वक्तव्य

मुंबई | आर्यन खान प्रकरणातील गुंता अधिकच वाढताना दिसत आहे. सुनावणी दोनदा पुढे ढकलण्यात आल्याने आर्यन खानची पोलिस कोठडी वाढतच गेली. मात्र आज या प्रकरणाची चौकशी होणार आहे. दरम्यान आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी अनेक बॉलिवूड कलाकारांनी आर्यनला पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. आता ज्येष्ठ गीतकार जावेद अख्तर यांनी याप्रकरणी भाष्य केलं आहे.

जावेद अख्तर हे आपल्या स्पष्टवक्तेपणासाठी बॉलिवूडमध्ये ओळखले जातात. आता त्यांनी आर्यन खानला पाठिंबा देताना मोठं वक्तव्य केलं आहे. ते म्हणाले. “मी पोर्टवर पकडलेल्या 1 डॉलर कोकेनबाबत एकही बातमी पाहिली नाही. मात्र 1.30 लाख चरस गांजा पकडल्याची बातमी नॅशनल न्यूज होते”, असा टोला त्यांनी लगावला आहे.

आर्यन खानकडे गांजा सापडला नसतानाही त्याला सोडलं का जात नाही?, असा प्रश्न अनेकवेळा विचारला जातोय. याबद्दल देखील जावेद अख्तर यांनी मत मांडलं. ते म्हणाले, “बॉलिवूड इंडस्ट्री हायप्रोफाईल असल्यामुळे बॉलिवूड नेहमीच शिक्षा भोगत आलं आहे.” असं बोलून त्यांनी आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणावरून लक्ष्य करणाऱ्यांवर निशाणा साधला आहे.

जावेद अख्तर नेहमी त्यांच्या बेधडक वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. आताही त्यांनी आपल्या वक्तव्यातून आर्यन खानला निष्कारण लक्ष्य केलं जात असल्याचं बोलून दाखवलं आहे. दरम्यान, बऱ्याच दिवसांपासून आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी लांबलेली सुनावणी आज होणार आहे. त्यामुळे आज सुनावणी दरम्यान काय निकाल दिला जातोय? याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

थोडक्यात बातम्या-

ठाकरे सरकारमुळेच कोरोना आटोक्यात, सामनाच्या अग्रलेखातुन संजय राऊतांचा हल्लाबोल

सकाळी-सकाळीच किरीट सोमय्यांच्या ट्विटने उडवली खळबळ, आज दुपारी करणार…

मोठी बातमी! नागपुरात निर्माणाधीन पुल कोसळला; अख्ख कुटूंब थोडक्यात बचावलं!

कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा मोठा निर्णय; राजकारणात नवं समीकरण दिसणार?

राज्याच्या कोरोना आकडेवारीत चढ-उतार, वाचा आजची ताजी आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More