बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘मुजोर माजी मंत्रिपुत्राच्या मुसक्या आवळा’; स्वाभिमानीचे गृहमंत्र्यांना निवेदन

मुंबई | दोन दिवसांपूर्वी वाळवा तालुक्यातील तांबवे येथील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पदाधिकारी रविकिरण माने यांना त्यांच्या घरी जावून सागर सदाभाऊ खोत यांच्यासह चार इतर साथीदारांनी मारहाण आणि शिवीगाळ केली होती. राजू शेट्टींसोबत काम करतो, हा राग मनात धरून त्यांनी माने यांना धमकावलं होतं.

रविकिरण माने यांनी कासेगावमधील वाळवा येथील पोलीस ठाण्यात सागर खोतसह अन्य साथीदारांविरुद्ध फिर्याद दिली. याबाबत आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने युवा आघाडीचे राज्य प्रवक्ते रणजित बागल यांनी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची भेट घेतली आहे.

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव श्रीकांत शिंदे आणि शिवसेना सोलापूर विधानसभा अध्यक्ष सागर तांबोळकर देखील यावेळी उपस्थित होते. यावेळी, आरोपी सागर खोत व त्याच्या साथीदारांवर कठोर कारवाई करावी. समाजामध्ये दहशत पसरवू पाहणाऱ्या खोत याच्या मुसक्या आवळाव्या, अशी मागणी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे

दरम्यान, याबाबत गृहमंत्र्यांची अतिशय सकारात्मक चर्चा झाली असून तातडीने याबाबत गृहविभागाकडून तातडीने कडक कारवाई केली जाईल, अशी ग्वाही गृहमंत्र्यांनी दिली असल्याचं बागल यांनी सांगितले आहे.

थोडक्यात बातम्या-

राऊतांच्या 2 अपेक्षा, भाजपचे 5 प्रश्न; राऊत-भाजप वाकयुद्ध रंगलं!

केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ‘या’ सहा पिकांच्या MSPमध्ये वाढ

धक्कादायक! तालिबान्यांच्या भीतीने देश सोडून गेलेल्या नागरिकांना ‘या’ शेजारी राष्ट्राने हाकललं

नारायण राणे आणि उद्धव ठाकरे आमने-सामने, संपुर्ण महाराष्ट्रांचं लक्ष!

“राज्यात मुख्यमंत्र्यासह अनेक मंत्री भ्रष्टाचारी, काही मंत्री भाई लोकांची मदत घेत आहेत”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More