बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘न्यूड सीन दिले नाही म्हणून माझं करिअर संपलं’; ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीचा धक्कादायक खुलासा

मुंबई | अभिनेत्री आणि माॅडेल नरगिस फाखरी सोशल मीडियावर बरीच सक्रिय असलेली पाहायला मिळते. ती सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या चाहत्यांशी संवाद साधत असते. नरगिस तिच्या ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत असलेली पाहायला मिळते. अशातच नरगिस एका वेगळ्या कारणामुळे चर्चेचा विषय ठरत आहे.

नरगिस फाखरीनं एका मुलाखतीत तिच्या करिअर विषयी सांगितलं. नरगिसनं म्हटलं की, मला प्रसिद्धीची अजिबात लालसा नाहिये. ‘मी न्यूड पोझ देऊ की दिग्दर्शकासोबत रात्र घालवू’ मी अशा अनेक संधी माझ्या हातातून सोडल्या आहेत, कारण मला अशा कोणत्याच गोष्टी करायच्या नव्हत्या. मी येथे टिकून राहण्यासाठी प्रयत्न नाही केला, कारण माझ्या काही मर्यादा होत्या.

पुढे नरगिसनं म्हटलं की, माझ्या काम करताना काही मर्यादा आहेत. त्यामुळे मला या गोष्टीचं वाईट वाटतं की, या अशा गोष्टींमुळे माझं करिअर संपलं. मी आत्ता बाॅलिवडूमध्ये जिथे कोठे आहे त्याठिकाणी मी आनंदी आहे. कारण मी माझ्या तत्वांवर चालते आणि इंटिमेट सीन देत नाही. अशा प्रकारच्या अनेक ऑफर्स आल्याच्या नरगिसनं यावेळी सांगतिलं मात्र मी या सगळ्यांना नकार दिला.

दरम्यान, नरगिस फाखरीनं राॅकस्टार या बाॅलिवूड चित्रपटातून पदार्पण केलं होतं. अभिनेता रणबीर कपूर आणि नरगिस यामध्ये सोबत झळकले होत. या चित्रपटानं नरगिसला भरपूर लोकप्रियता मिळवून दिली. सध्या नरगिस आपल्या बाॅयफ्रेंडसोबत क्वालिटी टाईम स्टेंड करत आहे.

थोडक्यात बातम्या –

‘मीडियावाले उगीच कंड्या पिकवू नका’; फडणवीसांनी माध्यमांना फटकारलं!

मोठी बातमी! एकनाथ खडसे बॉम्बे रूग्णालयात दाखल

कोरोनाचा कहर! आणखी एक नवा व्हेरिएंट आला समोर

खुशखबर! पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा पुढील हप्ता ‘या’ तारखेला मिळणार

एक ही तो दिल है, कितनी बार जितोगे, नीरजकडून ऑलिम्पिक पदक मिल्खा सिंग यांना समर्पित!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More