बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझं करिअर संपवतोय, मितालीचा आरोप; ‘हिचे नखरेच जास्त’, पोवारचं उत्तर

मुंबई | भारतीय महिला क्रिकेट टीमला नवा प्रशिक्षक मिळाला आहे. टीम इंडियाचे माजी क्रिकेटपटू रमेश पोवार यांची महिला क्रिकेट टीमच्या प्रशिक्षपदी निवड करण्यात आली आहे. रमेश पोवार दुसऱ्यांदा कोच बनले आहेत. 2018 साली ते भारतीय महिला संघाचे कोच होते. परंतु भारतीय महिला संघाची कर्णधार मिताली राज सोबतच्या वादानंतर त्यांना प्रशिक्षकपदावरुन दूर करण्यात आलं होतं.

रमेश पोवार यांच्या प्रशिक्षणाखाली भारतीय महिला संघाने 2018 च्या टी -20 च्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. मितालीने पोवार यांच्यावर इंग्लंड विरुद्ध हरमनप्रीत कौर हिच्या नेतृत्वात टी -20 वर्ल्ड कप उपांत्य फेरीतून बाहेर काढल्याचा आरोप केला होता. मितालीने बीसीसीआयला तसं पत्र लिहिले होते आणि पोवार यांनी माझी कारकीर्द संपवण्यासाठी आणि माझा अपमान करण्यासाठी असे केल्याचा आरोप केला होता. “मिताली खूपच नखरे दाखवते आणि संघात विनाकारण वाद निर्माण करते,” असं पोवार यांनी प्रत्युत्तर दिलं होतं.

मितालीसोबत पंगा घेतल्यानंतर रमेश पोवार यांना पदावरून हटविण्यात आले. हरमनप्रीत कौर आणि स्मृती मंधाना या सिनिअर महिला खेळाडूंनी पोवार यांच्या समर्थनार्थ बीसीसीआयला पत्र लिहिले होते तरी पोवार यांना पदावरुन हटविण्यात आले होते. यानंतर डब्ल्यूव्ही रमण यांची महिला संघाचे प्रशिक्षक म्हणून निवड झाली. महिला संघाच्या जबाबदारीतून मुक्त झाल्यानंतर पोवारने स्वत: ला प्रशिक्षक म्हणून सिद्ध केले.

दरम्यान, महिल्या संघाच्या प्रशिक्षकपदासाठी एकूण 35 जणांनी अर्ज केले होते. त्यातून 8 जणांची निवड करण्यात आली होती. यामध्ये डबल्यू व्ही रमन, रमेश पवार, ऋषिकेश कानिटकर, अजय रात्रा, सुमन शर्मा, ममाथा माबेन, हेमलता काला आणि देविका वैद्य यांचा समावेश होता.

थोडक्यात बातम्या – 

लाॅकडाऊनचा सकारात्मक परिणाम?; मुंबईत कोरोनाबाधितांच्या संख्येत दिवसेंदिवस घट

महाविकास आघाडीत बिघाडी?; राष्ट्रवादी विरुद्ध मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अशी खडाजंगी

“पंतप्रधानांनीही पाकिस्तानात जाऊन बिर्याणी खाल्ली, तेव्हा त्यांचा धर्म भ्रष्ट झाला का?”

ऐकावं ते नवलंच! लॉकडाऊनमध्ये बायकोला भेटण्यासाठी पठ्ठ्याने पळवली बस, अन्….

विनापास गोव्याला चाललेल्या पृथ्वीला पोलिसांनी पकडलं, पाहा पुढे काय घडलं!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More