बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्या कोंबडीच्या पोटात दुखतंय’; लॉकडाऊनमध्ये बाहेर पडलेल्या व्यक्तीचं पोलिसांना उत्तर, पाहा व्हिडीओ

बंगळुरू |  सध्या सगळीकडे कोरोनाची दुसरी लाट सुरू आहे. त्यामुळे कोरोनाबाधित रूग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत चालली आहे. या वाढत्या रूग्णसंख्येमुळे आरोग्य यंत्रणेवर ताण आल्याचं दिसत आहे. ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी सरकारने लॉकडाऊन जाहीर केलं आहे.

यामध्ये केवळ अत्यावश्यक सेवाच सुरू राहणार असल्याचं सरकारकडून सांगण्यात आलं आहे. परंतू, तरी देखील काही नागरिक याकडे गांभिर्याने पाहत नसल्याचं दिसून येत आहे. लॉकडाऊनच्या नियमांचं उल्लंघन केल्यामुळे पोलिसांनी कारवाई करतानाचे याआधीही खूप व्हिडीओ व्हायरल झाले आहेत. परंतू, या वेळी सोशल मीडियावर जो व्हिडीओ व्हायरल झाला आहे. तो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

व्हायरल होत असलेल्या व्हिडीओ एक व्यक्ती आपल्या कोंबडीला घेऊन बाहेर पडला आहे. लॉकडाऊन असूनही तो व्यक्ती घराबाहेर फिरत असल्यामुळे त्याला पोलिसांनी पकडलं. त्यावेळी पोलिसांनी तू कुठे चालला आहेस? असा प्रश्न त्या व्यक्तीला विचारला. त्यावर त्या व्यक्तीने माझ्या कोंबडीच्या पोटात दुखत आहे. त्यामुळे मी तिला डॉक्टरांकडे घेऊन जात असल्याचं त्यानी सांगितलं.

त्या व्यक्तीने दिलेलं उत्तर ऐकून पोलिसांना हसूच आवरत नसल्याचं व्हिडीओमध्ये दिसत आहे. त्यानंतर तुझ्या कोंबडीवर घरीच उपचार कर, असं सांगत पोलिसांनी त्याला घरी पाठवलं. ही घटना कर्नाटकमधील गडग जिल्ह्यातील असल्याचं समजत आहे. तसेच त्या व्यक्तीने दिलेल्या अजब उत्तरामुळे हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

पाहा व्हिडीओ-

थोडक्यात बातम्या-

हाताने पकडायला गेली भलामोठा साप अन्…; अंगावर काटा आणणारा व्हिडीओ व्हायरल

“शरद पवार गॉडफादर, मग ठाकरे सरकारच्या निर्णयाचा दोष त्यांच्यावर जाणारच”

जीमचा प्रभाव पाहण्यासाठी महिलेनं काढले तसले फोटो, अन् चुकून घडला धक्कादायक प्रकार

‘पवारांनी येडं पेरलं अन् खुळं उगवलं’, गोपीचंद पडळकरांचा ठाकरे सरकारवर हल्लाबोल

ऐश्वर्या रायपासून दूर राहा; संजय दत्तला मिळाली होती धमकी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More