माझ्या वक्तव्याचा विपर्यास करण्यात आला- नितीन गडकरी

मुंबई |फरारी उद्योगपती विजय मल्ल्या याच्याबाबतचे माझे वक्तव्य मोडतोड करून प्रसिद्ध करण्यात आले, असं स्पष्टीकरण केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिलं आहे.

मल्ल्याने 40 वर्ष कर्जाची परतफेड केली तो एका वर्षात फ्राॅड होऊ शकत नाही, असं गडकरी म्हणल्याचं प्रसिद्ध झालं होतं. त्यानंतर त्यांच्यावर विरोधकांनी टीका केली होती.

मी बोललेली वक्तव्यं संदर्भ सोडून प्रसिद्ध करण्यात आली, त्यामुळे माझ्या म्हणण्याचा अर्थ बदलला, असं त्यांनी म्हटलं आहे.

व्यवसायातील चढ-उतारांदरम्यान व्यावसायीकांना आवश्यक असलेल्या पाठिंब्याबाबत मी बोलत होतो. कुढल्याही घोटाळ्याला समर्थन करण्याचा प्रश्नचं उद्भवत नाही, असं त्यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-अबब!! इशा अंबानीच्या लग्नात चक्क अमिताभ आणि आमीर वाढपी

-संभाजी भिडे VS दलित पॅंथर: भिडेंच्या कार्यक्रमाला पोलिसांनी परनावगी नाकारली

-…ही तर आर्थिक दहशतवादाची सुरुवात; सामनातून RBI गव्हर्नर वादावर हल्लाबोल

-रामदास कदम म्हणजे उद्धव ठाकरेंनी पाळलेलं कुत्रं- नितेश राणे

-“पंतप्रधान मोदींमुळेच काश्मीर खोऱ्यात हिंसाचार वाढला”