बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

अशा वातावरणात वाढदिवस साजरा करणं मनाला पटत नाही, भेटीसाठी घरी येऊ नका- राज ठाकरे

मुंबई | कोरोनामुळे यंदा अनेकांना अडचणीचा सामना करावा लागत आहे. राजकीय पक्षांना देखील कोरोनाचा सामना करावा लागत आहे. येत्या 14 जून रोजी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस असल्यानं त्यांनी कार्यकर्त्यांना पत्र लिहून भावनिक आवाहन केलं आहे. मागील वर्षभरापासून देशावर तसेच राज्यावर कोरोनाचं संकट आहे. अशा परिस्थितीत गर्दी होऊ नये ही जबाबदारी ठेऊन राज ठाकरेंनी मनसेच्या कार्यकर्त्यांना पत्र लिहिलं आहे.

दरवर्षी मी तुमच्या भेटीची वाट पाहत असतो. तुम्हाला भेटल्यावर आनंद होतो आणि अंगात नवा उत्साह संचारतो, ऊर्जा मिळते. मात्र मागच्या वर्षीसारखचं, हेही वर्ष बिकट आहे. अजूनही कोरोनानं महाराष्ट्राला घातलेला विळखा सोडलेला नाही. परंतु परिस्थिती अजूनही गंभीर आहेच. अशा वातावरणात वाढदिवस वैगेरे साजरा करणं मनाला पटत नाही. माझे सहकारी म्हणून तुम्ही हे नक्की समजून घ्याल, असं राज ठाकरे यांनी या पत्रात म्हटलं आहे.

मी तुम्हाला अत्यंत मन:पूर्वक आणि आग्रहाची विनंती करेन की, माझ्या भेटीसाठी घरी येऊ नका. तुमच्या घरीच राहा. जिथे आहात तिथे सुरक्षित राहा. तुम्ही प्रेमानं घरी याल आणि आपली भेट होणार नाही असं व्हायला नको. तुम्ही सर्वांनी या काळात जागरूकपणे चांगलं काम केलंत. ज्याचा मला फार अभिमान आहे. असच कामात राहा. त्या सर्वांना धीर द्या, असं त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितलं आहे.

दरम्यान, थोड्याच दिवसांत मी तुम्हाला भेटणार आहे. पक्षाच्या धोरणांविषयी, नव्या कार्यक्रमांविषयी तुमच्याशी मला बोलायचं आहे. असं राज ठाकरे यांनी पत्रात म्हटलं आहे. माझ्या कार्यकर्त्यांमुळेच आणि पक्षामुळेच राज ठाकरे आहे, असं त्यांनी मागे एका कार्यक्रमात म्हटलं होतं.

पाहा पत्र-

 

थोडक्यात बातम्या-

कोरोना लस घेण्यास रामदेव बाबा तयार, म्हणाले,’डॉक्टर हे पृथ्वीवरील देवदूत’

‘हमीभाव दिल्याचा सरकारचा दावा कोणत्याही तज्ज्ञाने सिद्ध करून दाखवावा’; राजू शेट्टींचं आव्हान

‘गुप्ता, मी लय बारीक बघतो, हे काम छा-छू झालंय’; पुणे पोलीस आयुक्तांना अजित पवारांनी सुनावलं

प्रसिद्ध निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर शरद पवारांच्या भेटीला; राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

“मुस्लिमांची वाढती लोकसंख्या विनाशाचं कारण; प्रत्येक हिंदूने 5-6 मुलांना जन्म द्यावा”

‘पेरणीसाठी किडनी विकण्याची परवानगी द्या’; शेतकऱ्याची थेट मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More