बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माय मरो आणि गाय जगो हे आमचं हिंदुत्व नाही- उद्धव ठाकरे

मुंबई | दसरा मेळ्याव्याच्या निमित्ताने आज शिवसेनाचा दसरा मेळावा पार पडला. दसरा मेळावा हा कोरोनाचे नियम पाळून षन्मुखानंद सभागृहात पार पडत आहे. शिवसेना पक्षप्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत पार पडत आहे. या भाषणात उद्धव ठाकरे यांनी चौफेर टीका केली आहे.

सावरकर-गांधी शब्द उच्चारण्याची तुमची लायकी नाही. नवहिंदुत्वापासून हिंदुत्वाला धोका आहे. मोहन भागवतांचे विचार त्यांनी म्हटलंय हिंदुत्व म्हणजे सर्वांचे पूर्वज एक होते, हे जर आपल्याला मान्य असेल तर विरोधी पक्षाचे पूर्वज परग्रहावरुन आले होते का?, असा सवाल देखील उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे.

माय मरो आणि गाय जगो हे आमचं हिंदुत्व नाही, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आपण मेळाव्यात विचार मांडतो ते पाळणार नसेल तर दसरा मेळाव्यांची काय गरज आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या-

“आमचं आजही आव्हान आहे हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा”

“हरहर महादेव हे दिल्लीच्या तख्ताला दाखवून देण्याची वेळ”

शिवसेनेचा आवाज दाबणारा जन्माला यायचाय- उद्धव ठाकरे

“कोरोना ‘ना स्त्री, ना पुरूष’ अशा मनोवृत्तीच्या लोकांना होणारा रोग आहे”

”पंकजा मुंडेंचे हेलिकॅाप्टर फिरलं नाही तर कोणी आमदार खासदार होत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More