बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझ्या वडिलांनी माझ्या स्वप्नांचा जीव घेतला, त्यांना तुरुंगात टाका”

नवी दिल्ली | सोशल मीडियावर ‘फ्री-ब्रिटनी’ हॅशटॅग मोठ्या प्रमाणात व्हायरल होत होते. हा हॅशटॅग वापरुन अनेकांनी प्रसिद्ध अमेरिकन पाॅप स्टार ब्रिटनीची पोस्ट केली होती तर काहींनी त्यांच्या इन्स्टाग्राम स्टोरीवर हा हॅशटॅग वापरून ब्रिटनीला पाठिंबा दिला होता. मात्र आता पुन्हा एकदा पाॅप स्टार ब्रिटनीने पोस्ट शेअर करत वडिलांवर निशाणा साधला आहे.

आपल्या वडिलांनी आपल्या स्वप्नांचा जीव घेतला असल्याचं तिने यावेळी म्हटलं आहे. ब्रिटनी स्पीअर्स ही अमेरिकन पाॅप स्टार असून तिचं ‘बेबी वन मोर टाईम’ हे गाणं सर्वात जास्त सुपर हिट झालं होतं. त्यानंतर ब्रिटनीने लोकांच्या मनावर राज्य करण्यास सुरुवात केली. मात्र ब्रिटनीचेे वडिल जेमी स्पीअर्स हेच ब्रिटनीच्या आयुष्याचे सर्व निर्णय घेतात. यावरुनच आपले वडिला आपला आर्थिक छळ करत असल्याचं देखील ब्रिटनीने म्हटलं आहे.

ब्रिटनीवर अनेक जण टीका करत असून ती ज्याला सामोर जाते हे कोणालाही कळू शकणार नाही असं तिने या पोस्टमधून सांगितलं आहे. ब्रिटनीने याबाबत कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे. माझे वडील घोटाळेखोर असून त्यांना तुरुंगात टाका, अशी विनंती देखील तिने कोर्टात केली आहे.

दरम्यान, ब्रिटनी हे सर्व गेले 13 वर्षांपासून सहन करत आहे. याबाबत बाॅलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने ब्रिटनीला पाठिंबा दर्शवत इन्टावर एक स्टोरी शेअर केली आहे. यानंतर रिया देखील चर्चेत आली होती. यापुर्वी देखील बाॅलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात तिचं नाव समोर आल्यानंतर ती चर्चेत आली होती.

पाहा पोस्ट:

 

View this post on Instagram

 

A post shared by Britney Spears (@britneyspears)

थोडक्यात बातम्या-

“कुत्रे सोडल्यासारख्या तपास यंत्रणा अंगावर सोडल्या जात आहेत”

मुसळधार पावसात जखमी बाप-लेकीच्या मदतीला धावले पोलीस, पाहा व्हिडीओ

‘ओ शेठ तुम्ही नादच केलाय थेट’; युवक काँग्रेसचं बोंबाबोंब आंदोलन

अमिताभ बच्चन की सोनू सूद?; फोटो पाहून चाहतेही पडले गोंधळात, पाहा फोटो

“आम्ही दिवा स्वप्न पाहत नाही, आमचं स्वप्न 2024ला पूर्ण करू”

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More