बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझ्या नवऱ्याची बायको’ फेम अभिनेत्री रसिका सुनिलने चाहत्यांना दिली गुड न्यूज!

मुंबई | छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका ‘माझ्या नवऱ्याची बायको’ प्रचंड गाजली. या मालिकेमुळे प्रसिद्धी झोतात आलेली अभिनेत्री म्हणजे रसिका सुनिल. रसिका ही नेहमीच सोशल मीडियावर सक्रिय असलेली पहायला मिळते. यातच आता रसिकानं आपल्या चाहत्यांसाठी एक गुड न्यूज शेअर केली आहे.

अभिनेत्री रसिका सुनिल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. तिनं आपल्या बॉयफ्रेंडसोबतचा एक गोड फोटो आपल्या इंस्टाग्रामवर शेअर करत ही गुड न्यूज दिली आहे. रसिका सोशल मीडियावर आपल्या बाॅयफ्रेंडसोबत फोटो शेअर करत असते. रसिकानं अनेकदा एकमेकांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

व्हॅलेंटाईनडेच्या दिवशीही तीनं आदित्यसोबत रिलेशनमध्ये असल्याचं सांगत त्यांच्या नात्यावर भाष्य केले होते. रसिकाचा बॉयफ्रेंड आदित्य बिलागीनं एक पोस्ट शेअर केलीय. रसिकानंही हीच पोस्ट शेअर केली आहे. यात तिचा लाडका श्वान रश देखील दिसतोय. तिघांनी हातात एक पाटी पकडली आहे. या पाटीवर “माझे मानव दोस्त लग्न करत आहेत” असं लिहिलं आहे.

दरम्यान, आदित्य हा सॉफ्टवेअर इंजिनीअर असून तो लॉस एंजेलिसमध्ये राहतो. तो एक उत्कृष्ठ डान्सर देखील आहे. रसिका आणि आदित्य आता कधी लग्न करणार याकडे चाहत्यांच्या नजरा लागल्या आहेत.

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Aditya Bilagi (@adi_bilagi)

थोडक्यात बातम्या – 

‘या’ गोळीने कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा धोका 50 टक्क्यांनी कमी झाला ;अमेरिकन कंपनीचा दावा

भारतीय रेल्वेने भंगार विकून कमावले कोट्यवधी रुपये; आकडा वाचून थक्क व्हाल

“अन्याय सहन करूनही फक्त पवारसाहेबांवर असलेल्या प्रेमापोटी राष्ट्रवादीबरोबर आहे”

महत्वाची बातमी! आता वाहनांची कागदपत्रे 31 ऑक्टोबरपर्यंतच वैध, वाचा सविस्तर

पुढील चार दिवस राज्यातील ‘या’ भागात मुसळधार पावसाची शक्यता!

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More