Top News

ईडीने खेळीमेळीच्या वातावरणात माझी चौकशी केली- प्रताप सरनाईक

मुंबई | शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक यांच्या घरावर तसंच ऑफीसवर ईडीने छापा टाकला होता. त्यानंतर ईडीकडून प्रताप सरनाईक यांनी चौकशीही झाली.

दरम्यान ईडीने केलेली माझी पाच तासांची चौकशी ही सर्व खेळीमेळीच्या वातावरणात पार पडल्याचं प्रताप सरनाईक यांनी सांगितलंय. विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनावेळी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

प्रताप सरनाईक म्हणाले, “ईडीच्या चौकशीसाठी आता मला पुन्हा जावं लागणार नाही. मात्र काही प्रश्न असल्यास मला बोलावल्यावर 2 तासांत हजर होईन.”

माझ्या चौकशीच्या दरम्यान प्रश्न आणि उत्तरांचा वेळ खेळीमेळीच्या वातावरणात पार पडला. तसंच या घोटाळ्यातील दोषींना कडक शासन व्हायला पाहिजे, असंही सरनाईक म्हणालेत.

थोडक्यात बातम्या-

3 कोटी काय अद्याप 1 रूपयाही खर्च केला नाही; धनंजय मुंडेंचं स्पष्टीकरण

शेतकरी आंदोलनाचा गैरफायदा घेण्याच्या प्रयत्नात ‘तुकडे-तुकडे गॅंग’-रविशंकर प्रसाद

‘कोरोना, कोरोनाचा बाप, कोरोनाचा आजोबा पण…’; सुधीन मुनगंटीवार अधिवेशनात आक्रमक

पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे याचं निधन; वयाच्या 86 व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

“मोदी सरकारचे धोरण नको तिथं बोलायचं आणि हवं तिथं हाताची घडी तोंडावर बोट ठेवायचं”

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या