‘माझा प्रवास तुमच्याशिवाय शक्य नव्हता’; 100 व्या टेस्टवेळी विराट भावूक
नवी दिल्ली | भारताचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीनं 100 वा कसोटी सामना खेळला. 27 महिन्यांपासून 48 आंतरराष्ट्रीय डाव यामध्ये विराट कोहली शतकापासून वंचित राहिला आहे. टीम इंडियाचे हेड कोच राहुल द्रविडनं विराटचा स्मृतीचिन्ह देऊन खास सत्कार केला.
सत्कार स्विकारल्यानंतर विराट चांगलाच भावूक झालेला पहायला मिळालं. 2011 साली विराटनं टेस्ट क्रिकेटमध्ये पदार्पण केलं. 11 वर्षानी त्यानं हा ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. 100 टेस्ट पूर्ण करणारा विराट कोहली हा 12 वा भारतीय खेळाडू बनला आहे.
राहुल भाई या खास क्षणासाठी धन्यवाद. हा टीम गेम आहे. माझी पत्नी माझ्यासोबत इथं आहे, माझा भाऊ स्टँडमध्ये उपस्थित आहे. माझा संपूर्ण प्रवास तुमच्याशिवाय शक्य नव्हता. बीसीसीआयचे धन्यवाद. माझ्या लहाणपणीच्या हिरोकडून मला हा पुरस्कार मिळतोय. मी अंडर 15 खेळत असतानाच्या काळातील तुमचा फोटो आजही माझ्याकडे आहे. असं, सत्कार स्विकारल्यानंतर विराटनं यावर प्रतिक्रिया देताना म्हटलं.
दरम्यान, भारत विरूध्द श्रीलंका याच्यामध्ये 2 टेस्ट सिरीजची पहिली मॅच मोहाली मध्ये सुरू आहे. भारतानं टॉस जिंकून फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
थोडक्यात बातम्या –
मोठी बातमी! ठाकरे सरकारचा एसटी कर्मचाऱ्यांना दणका
राज ठाकरेंच्या दमदार आवाजातील ‘हर हर महादेव’चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडीओ
सिद्धार्थ शुक्लाच्या सोशल मीडिया अकांऊटमध्ये मोठा बदल, चाहतेही भावूक
‘आम्ही कुणाच्या दबावाला भीक घालत नाहीत’; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं
“तुम्ही पाच वर्षात काही केलं नाही आणि आम्हाला 15 दिवसात करायला सांगता”
Comments are closed.