Top News राजकारण

‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, शॉकसाठी तयार रहा; मनसेचा सरकारला इशारा

मुंबई | वीजबिलाच्या मुद्द्यावरून आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आक्रमक पवित्रा घेतला आहे. सोमवारी वीज दरवाढी विरोधात आंदोलन करण्याचा इशारा मनसेने दिलाय. यासंदर्भात संपूर्ण दादर-माहीम परिसरात होर्डिंग्ज देखील लावण्यात आले आहेत.

हे होर्डिंग्ज लावताना मनसेने ठाकरे सरकारच्या ‘माझे कुटुंब,माझी जबाबदारी’ या वाक्याला टार्गेट केलंय. मनसेकडून लावण्यात आलेल्या होर्डिंग्जवर ‘माझे लाईट बिल, माझी जबाबदारी’, ‘सोमवारी भेटूच शॉकसाठी तयार राहा’, असं लिहिण्यात आलंय.

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत वीजबिल माफ करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे मनसेने कठोर निर्णय घेत थेट आंदोलनाचा इशारा दिलाय.

मनसेनेचे विभाग प्रमुख यशवंत किल्लेदार यांनी हे होर्डिंग लावलेत. सर्वसामान्य नागरिकांचा विचार करणं ही मुख्यमंत्र्यांची जबाबदारी आहे. आम्ही त्यांना केवळ त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देतोय आणि त्यासाठी ही होर्डिंगबाजी करण्यात आली असल्याचं किल्लेदार यांनी सांगितलंय.

महत्वाच्या बातम्या-

‘या’ व्यक्तीसोबत रोहित पवारांना लाँग ड्राईव्हला जायला आवडेल!

मुंबईकरांनो सावधान! कोरोनाच्या रूग्णांमध्ये गेल्या 4 दिवसांत लक्षणीय वाढ

महाराष्ट्रातील भाजपचे पुढारी कोरोनाचं राजकारण करतायत; संजय राऊत यांची टीका

भाजपने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार स्वप्नातच ठरवावा; अनिल परब यांचा आशिष शेलारांना टोला

18 तासांच्या चौकशीनंतर भारतीचा पती हर्ष लिंबाचियाला देखील अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या