मनोरंजन

“माझं नशीब चांगलं, माझं नाव #MeeToo मध्ये नाही आलं”

मुंबई | “माझं नशीब चांगलं माझं नाव #MeeToo मध्ये नाही आलं” मी अनेक गोष्टी केल्यात पण आतापर्यंत माझ्यावर कोणत्याही प्रकारचे आरोप झालेले नाहीत, असं वक्तव्य ज्येष्ठ अभिनेते आणि राजकीय नेते शत्रुघ्न सिन्हा यांनी केलं आहे.

हा #METOO चा जमाना आहे आणि आजच्या काळात यशस्वी माणसाला उद्वस्त करण्यामागे एक स्त्री आहे. हे सांगण्यात मला काहीच संकोच वाटणार नाही असंही त्यांनी सांगितलं.

या मोहिमेअंतर्गत अनेक प्रसिद्ध माणसांना महिलांनी उद्ध्वस्त केलंय हे मला जाणवलं, असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळे उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला.

दरम्यान, मी अनेक गोष्टी केल्या पण सुदैवानं मी #METOO च्या तडाख्यातून वाचलो. माझं नाव या मोहिमेतून बाहेर आलं नाही, असंही शत्रुघ्न सिन्हा यांनी यावेळी स्पष्ट केलं.

महत्वाच्या बातम्या-

-संजय राऊतांच्या शिवसेनेतल्या विरोधकांना झाला आनंद !!

राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर भाजपात प्रवेश करणार??

-राधाकृष्ण विखेंची पुतणी देणार स्वीडिश पंतप्रधानांना सल्ला

-मोदी फकीर, त्यांना महागाई कशी कळणार?- अजित पवार

-माझी पुन्हा फसवणूक केल्यास, सरकारला उघडं पाडू- अण्णा हजारे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या