बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझं नाव ज्ञानदेवच पण, बायको मला प्रेमानं दाऊद म्हणायची”

मुंबई | राज्यासह देशात गाजत असलेलं मुंबईतील ड्रग्ज प्रकरण दररोज नवीन वळण घेत आहे. एनसीबीचे विभागीय अधिकारी समीर वानखेडे यांच्या कार्यक्षमतेवर आणि नितीमत्तेवर महाविकास आघाडीकडून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आलं आहे. समीर वानखेडे यांचं लग्न, धर्म, नोकरी, या गोष्टीमुळं सध्या राज्यातील वातावरण ढवळून निघत आहे. अशातच समीर वानखेडे यांच्या वडिलांनी नवीन दावे केले आहेत.

समीर वानखेडे हिंदू की मुस्लीम हा वाद रंगला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ढीगभर पुरावे सादर करत समीर वानखेडे मुस्लीम असल्याचं म्हटलं होतं. समीर वानखेडे यांनी मात्र हे आरोप फेटाळून लावले होते. समीर वानखेडे यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांनी माध्यमांसमोर येत माझ नाव ज्ञानदेव आहे पत्नी मला लाडानं दाऊद म्हणत होती असा खुलासा केला आहे.

एनसीबीनं क्रुझवर कारवाई करत ड्रग्ज प्रकरणाचा खुलासा केला होता पण सध्या हे प्रकरण वेगळ्याच दिशेनं जात असल्याचा आरोप भाजपनं केला आहे. परिणामी राज्यात भाजप व  महाविकास आघाडी यांच्यात समीर वानखेडे आणि आर्यन खान प्रकरणावरून जोरदार शाब्दिक युद्ध रंगलं आहे. अशातच आता ज्ञानदेव वानखेडे यांच्या खुलास्यानंतर या प्रकरणात आणखीन गोंधळ निर्माण झाला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावर आरोप करताना ट्विटरवर पुराव्यांची माळ उघडली आहे. या प्रकरणाला आपण धार्मिक रंग देत नसून समीर वानखेडे यांचा खोटारडेपणा उघड करणार आहोत, असं मलिक म्हणाले आहेत.

थोडक्यात बातम्या 

“असा महापुरुष धरतीवर एकदाच येतो, मोदी साधारण व्यक्ती नाही तर देवाचा अवतार”

सर्वोच्च न्यायालयाचा मोदी सरकारला दणका! पेगासस प्रकरणी उचललं ‘हे’ मोठं पाऊल

‘वानखेडेंनी कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या’; आणखी एका साक्षीदाराचा धक्कादायक खुलासा

“मी आजही हिंदूच, आईची इच्छा होती म्हणून मी…”

समीर वानखेडे यांचा निकाह लावून देणारे मौलाना आले समोर; केले ‘हे’ धक्कादायक खुलासे

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More