बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“आई-वडिलांनी बिग बॅासमध्ये जाऊ नको म्हणून सांगितलं होतं, पण…”

मुंबई | शिवलीला पाटीलने मराठी बिग बाॅस शोमध्ये सहभाग घेतला होता. मात्र प्रकृती खालावल्याने तिने स्वतः बिग बाॅसचं घर सोडलं. तरी एक वारकरी अशा शोमध्ये सहभागी झाल्याने वारकरी सांप्रदायाने नाराजी व्यक्त केल्याचं दिसत आहे. यावरुन ती प्रचंड ट्रोल होत असून तिच्या आई- वडिलांनी देखील तिला बिग बाॅसमध्ये जाण्यास नकार दिला होता, असं शिवलीलाने स्पष्ट केलं आहे.

बिग बाॅसची ऑफर आल्यानंतर आई-वडिलांनी मला शोमध्ये जाण्यास नकार दिला होता. मात्र मी बिग बाॅसमध्ये शहरातील लोकांना कीर्तन काय आहे? हे समजून सांगण्यासाठी गेले होते, असं शिवलीला पाटीलने म्हटलं आहे. तसेच एक पंजाबी ड्रेस घालणारी मुलगीसुद्धा एखाद्या फिल्म इंडस्ट्रीच्या व्यासपीठावर जाऊन स्वतःला सिद्ध करु शकते, हे जगाला दाखवून देण्यासाठी मी बिग बाॅसमध्ये जाण्याच्या निर्णयावर ठाम राहिले, असं देखील शिवलीलाने म्हटलं आहे.

पैसा आणि प्रसिद्धीसाठी शिवलीला बिग बाॅसमध्ये गेली असल्याचं अनेकांनी म्हटलं होतं. याबाबत बोलताना मी तिथं फक्त लोकांना कीर्तन काय आहे हे समजवण्यासाठी गेले होते, वारकरी सांप्रदाय, लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी गेले होते, वारकरी सांप्रदायाला पैसा प्रसिद्धीची गरज नाही, मलाही नाही, असं देखील यावेळी शिवलीलाने म्हटलं आहे.

दरम्यान, बिग बाॅसच्या घरात जाऊन मी चूक केली. मात्र मी तिथं राहून वारकरी संस्कृतीचं दर्शन घडवलं, मी अभंग गायले, ज्ञानेश्वरी वाचली, असं शिवलीलाने म्हटलं आहे. तसेच बिग बाॅसच्या घरात जाऊन देखील मी माझी वारकरी संस्कृती सोडली नाही. मात्र, केवळ एक महिला कीर्तनकार असल्याने वारकरी सांप्रदाय विरोध करत असल्याचं शिवलीला यांनी म्हटलं होतं.

थोडक्यात बातम्या-

“मी बिग बॅासमध्ये गेल्यामुळे काही लोकांपर्यंत कीर्तन परंपरा पोहोचली”

वापरलेल्या मास्कची पायपुसणी, धक्कादायक प्रकार उघडकीस आल्यावर महापालिकेची कारवाई!

“तृप्ती देसाई सुद्धा मला भिडताना विचार करुन भिडायच्या”

पिंपरी पोलिसांची धडाकेबाज कामगिरी; रावण गँगमधील 4 जणांना केली अटक

“महिना 100 कोटी वसुलीचे तरी कुठे लेखी आदेश दिले होते?”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More