‘माझे कार्यक्रम होत राहतील मी ते बंद करणार नाही’, गौतमी पाटीलची स्पष्ट भूमिका

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | गौतमी पाटीलच्या(Goutami Patil) लावणीनं प्रेक्षकांना अक्षरश: वेड लावलं आहे. लावणी(Lavni Dance) म्हटलं की आता गौतमीचं नाव समोर येत आहे. परंतु असं असलं तरी गौतमी बऱ्याचदा वादाच्या भोवऱ्यात अडकली आहे.

काही दिवसांपूर्वी गौतमीची लावणी पाहायला आल्यानंतर एका प्रेक्षकाचा चेंगरून मृत्यू झाला होता. यानंतर गौतमीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली होती. तसेच एकदा गौतमीच्या लावणीदरम्यान काहींनी स्टेजवर चढून धिंगाणा घातला होता. घडलेले अशे प्रकार लक्षात घेता काहीजण गौतमीच्या लावणीवर बंदी घालण्याची मागणी करत आहेत.

लावणीवर बंदी होत असल्याच्या मागणीवर गौतमीनं एक वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्टीकरण दिलं आहे. ती म्हणाली, ग्रामीण भागातील प्रेक्षकांनी मला प्रेम दिलं आहे, त्यामुळंच मी आज इथं आहे. मी एक कलाकार आहे. गावागावात जाऊन मी कार्यक्रम सादर करत असते. सुरूवातीला काही चुका झाली असतील पण आता सगळं व्यवस्थित सुरू आहे.

तसेच तिला तिच्या महत्वकांक्षेबद्दल प्रश्न विचारण्यात आल्यावर ती म्हणाली की, मला गाण्यांसाठी विचारणा होत आहे. माझा सिनेमाही येत आहे. आणखी काही गाणी किंवा चित्रपट आले तर मी करेन.

माझे कार्यक्रमही होतच राहतील ते मी बंद करणार नाही, असंही गौतमी मुलाखतीदरम्यान म्हणाली आहे. गौतमीच्या मुलाखतीची सध्या सोशल मीडियावर चर्चा रंगली आहे.

महत्वाच्या बातम्या-