Top News देश

‘माझा मुलगा अवघ्या 15 मिनिटात झाला कोरोनामुक्त’; डोनाल्ट ट्रम्प यांचा अजब दावा

नवी दिल्ली | जगभरात कोरोनाचा कहर आपण पाहिलात. जगातील चांगल्या चांगल्या म्हणजेच प्रगतशील देशांच्या अर्थव्यवस्थाही डगमगल्या. कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात पसरू लागला होता. कोरोनाने मोठ्या प्रमाणात जगात जीवितहानी झाली. कोरोना झाला तर जवळजवल एक आठवडाभर आपल्याला उपचार घ्यावे लागतात. मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ट ट्रम्प यांनी अजब दावा केला आहे.

माझा मुलगा अवघ्या 15 मिनिटात कोरोनामुक्त झाला असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं आहे. पेंसिलवेनियाच्या मार्टिन्सबर्ग येथील एका निवडणूक रॅलीत आपल्या समर्थकांशी संवाद साधताना ट्रम्प यांनी ही माहिती दिली.

काही दिवसांपुर्वी मेलनिया ट्रम्प आणि बॅरेन ट्रम्प यांना कोरोनाची लागण झाली होती. ट्रम्प यांनी एका रॅलीत बोलताना आपला मुलगा बॅरेनच्या रोगप्रतिकारशक्तीचा उल्लेख केला होता.

दरम्यान, बॅरेनने त्यानंतर आपल्याला शाळेत जायची इच्छाही व्यक्त केली असल्याचं ट्रम्प यांनी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

‘तुला थोबडवनार लवकरच, मुंबईत राहून कसं करिअर बनवतो तेच बघतो’; खोपकरांचा बिग बॉसमधील स्पर्धकाला इशारा

लवकरच मुंबईकरांसाठी लोकल सेवा होणार सुरु; ठाकरे सरकारने दिले संकेत

‘शरद पवारांनी तो प्रश्न केला आणि….’, तिकीट नाकारण्यासंदर्भात सुजय विखेंचा मोठा गौप्यस्फोट

नितीश कुमार भाजपाला धोका देतील; चिराग पासवान यांची टीका

‘बाबा मला नेहमी म्हणायचे की…’, वडिलांच्या आठवणीत मनदीप सिंग भावूक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या