बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“माझं शरद पवारांना आव्हान आहे की, डोक्यात दगड घालायचं…”

सोलापूर | भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर बुधवारी रात्री दगडफेक झाली. दगडफेकीनंतर पडळकर चांगलेच आक्रमक झाले आहेत. राष्ट्रवादीला गर्भित इशारा देताना दगडच काय गोळी घातली तरी मी शांत बसणार नाही, असा पवित्रा पडळकर यांनी बुधवारी माध्यमांशी बोलताना घेतला होता. त्यानंतर आज सकाळी माध्यमांशी बोलताना त्यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीला लक्ष्य केलं आहे.

माझ्या राज्यभर घोंगडी बैठकांमुळे राष्ट्रवादी जागेवरून हलली आहे. मुद्द्यांची बात करणारी राष्ट्रवादी गुद्द्यांवर आली आहे. राष्ट्रवादीचा खरा चेहरा लोकांसमोर आला आहे. बहुजनांवर अन्याय करणारे हे लोक आहेत. माझं शरद पवारांना आव्हान आहे की त्यांनी सांगावं, मुद्यावर बोलत असताना डोक्यात दगड घालायचं हे कोणत्या कलमात लिहलं आहे, असा सवाल पडळकरांनी शरद पवारांना विचारला आहे.

मी शरद पवारांवर काय टीका केली होती… मग मी बोललेलं इतकं वाईट वाटत असेल तर तुम्ही मोदींवर का बोलता?, असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. माझा आवाज कोणी दाबू शकत नाही. अजित पवारांनी आरक्षण घालवलं. ओबीसींचं आरक्षण यांच्या नाकर्तेपणामुळे गेलं. बहुजनांना जागं करण्याचा माझा प्रयत्न आहे, असं पडळकर म्हणाले आहेत.

दरम्यान, गोपीचंद पडळकर यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर विरोधी पक्षनेेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी फोनवरून विचारपूस केल्याचं पडळकरांनी सांगितलं आहे. आपण विचारांची लढाई विचारांनी लढू, असं आवाहान देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर झालेला हल्ल्ला हा भाजपने घडवून आणलेला स्टंट, राष्ट्रवादीच्या नेत्याचा गंभीर आरोप

राज्यपालांच्या पत्रावर नवाब मलिकांचं प्रत्युत्तर, म्हणाले…

…तोपर्यंत महाविद्यालये सुरु करता येणार नाही- उदय सामंत

“महाराष्ट्र दिल्लीशी झगडा करतो तेव्हा दिल्लीस शरण यावं लागतं”

सरकारला कसं अडचणीत आणायचं?, फडणवीसांच्या घरी प्लॅन ठरला

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More