बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘कोरोनाने माझा धडधाकट मित्र 15 दिवसात खाल्ला’; प्रविण तरडेंना अश्रू अनावर

मुंबई | मराठी चित्रपटसृष्टीतील नामांकीत दिग्दर्शक तसेच अभिनेता असलेले प्रविण तरडे यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. कोरोनाने प्रविण तरडे यांच्या जीवलग मित्राचं निधन झालं आहे. यानंतर तरडे यांनी आपली प्रतिक्रीया दिली आहे. तरडे यांनी त्यांच्या फेसबुक वरुन त्यांच्या मित्रासाठी पोस्ट केली आहे.

प्रविण तरडे यांच्या मित्राचं नाव अमोल धावडे असं आहे. अमोल यांनी प्रविण तरडेंच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे. अमोल हे निर्व्यसनी असून रोज व्यायाम करत असे. मात्र आपल्या अशा धडधाकट मित्राला कोरोनाने खाल्लं, अशी पोस्ट तरडे यांनी फेसबुकद्वारे केली आहे. अमोल लवकरच ‘सरसेनापती हंबिरराव’ चित्रपटात दिसणार होते.

पोस्टमध्ये लिहल्याप्रमाणे अमोल यांचा वाढदिवस 11 मे ला असतो आणि त्याचदिवशी प्रत्येक सिनेमाचं डबिंग सुरु करण्यात यायचं. तसेच हे आपल्या श्रद्धेचा एक भाग असल्याचं तरडेंनी यामध्ये लिहिलं आहे. 1999 साली आपण पुरुषोत्तम जिंकला तेंव्हा अमोल यांनी कडकडून मारलेली मीठी कशी विसरू रे मित्रा? असा सवाल देखील तरडेंनी यामध्ये केला. आपल्या मित्राच्या आठवणी लिहिताना आपण एकत्र नॅशनल खेळलो , एकांकीका केल्या, सिनेमे केले आणि आज एकटाच कुठेतरी निघून गेलास, तुझा शेवटचा मेसेज होता, बाय बाय प्रविण बहुदा सरसेनापती हंबीरराव सिनेमा पाहायचा राहणार राव आणि राहिलाच शेवटी, असं त्यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आपले अश्रू अनावर न झाल्याचं देखील प्रविण तरडेंनी त्यांच्या या पोस्टमध्ये म्हटलं आहे. डोळ्यातील पाणी थांबत नाही. ये रे आमल्या .. जिथे कुठे असशील सुखी राहा .. नाही तरी मी आणि पिट्या तुला ‘सुखी जीव’ असच म्हणायचो की .. सुखी राहा .. कुटुंबाची काळजी करू नको आम्ही आहोत मित्रा, अशा शब्दात तरडेंनी आपल्या मृत मित्राला दिलासा दिला आहे.

माझा मित्र अमोल धावडे गेला 🙏🙏🙏कोरोनाने आज एक निर्व्यसनी रोज व्यायाम करणारा धडधाकट जिवाभावाचा मित्र अवघ्या १५ दिवसात…

Posted by Pravin Vitthal Tarde on Sunday, April 25, 2021

थोडक्यात बातम्या-

‘अजून काही वर्ष ब्रिटीश भारतात पाहिजे होते’; दिग्दर्शक केदार शिंदे यांची फेसबुक पोस्ट

भारतातील कोरोनाची परिस्थिती पाहावेना; सुंदर पिचाई यांनी उचललं मोठं पाऊल!

#सकारात्मक बातमी | 105 वर्षीय आजोबा आणि 95 वर्षीय आजीची कोरोनावर मात

‘अँड द ऑस्कर गोज टू…’नोमडलँड’; सर्वोत्कृष्ट सिनेमाच्या पुरस्कारावर नाव कोरलं

“महाविकास आघाडी संकटाला संधी मानून राजकारण करत नाही”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More