बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘माझी बायको मला देव मानते’; रितेश देशमुखचा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल

मुंबई | बॉलिवूड अभिनेता रितेश देशमुख आणि त्याची पत्नी जेनेलिया डिसुझा देशमुख सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. रितेश आणि जेनेलिया त्यांच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरून रिल्सच्या माध्यमातून चाहत्यांच्या भेटीला येत असतात. रितेश आणि जेनेलियाचं नातं हे सर्वांपेक्षा काही वेगळंच आहे. दोघेही नवरा बायको कमी एकमेकांचे मित्रच जास्त वाटतात.

नुकतंच रितेशने त्याच्या इन्स्टाग्रामच्या अकाऊंटवरून मजेशीर व्हिडीओ प्रसारित केला आहे. या व्हिडीओमध्ये रितेश आपली पत्नी जेनेलिया विषयी गुपचूप काही गोष्टी सांगताना पहायला मिळत आहे. या व्हि़डीओमध्ये रितेश अतिशय गंभीर चेहरा करत माझी पत्नी मला देव मानते, असं म्हणताना दिसत आहे.

त्यानंतर जेनेलियाला हे खरं असल्याचं सांगितलं. रितेश म्हणतो की, मी अस्तित्वातच नाही, असंच माझी पत्नी जेनेलियाला वाटतं. तिला जर एखाद्या गोष्टीची गरज भासली तरच जेनेलिया माझ्याकडे येते. या व्हिडीओत पुढं जेनेलिया काय म्हणालास असं रितेशला म्हणते? त्यावर रितेश म्हणतो की, मी तुझं कौतूक करतोय, असं म्हणतो.

दरम्यान, हा व्हिडीओ पाहून चाहत्यांना हसू आवरत नाही. तसेच रितेश आणि जेनेलियाच्या बॉन्डविषयी चाहते कौतूक करत आहेत. या व्हिडीओला 45 लाख लोकांनी पाहिलं आहे तर, 6 लाखांपेक्षा जास्त चाहत्यांनी व्हिडीओला लाईक केलं आहे.

पाहा व्हिडीओ

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Riteish Deshmukh (@riteishd)

 

 

थोडक्यात बातम्या –

Altroz CNG च्या प्रतिक्षेत असलेल्या कार चाहत्यांसाठी खुशखबर, कार होतेय लाँच, जाणून घ्या किंमत!

‘मीडियाची मदत घेत सोमय्या खोटे आरोप करत…’; मनिषा कायंदेंचा सोमय्यांवर घणाघात

भाजपने ‘ती’ प्रथा मोडली, थोरांतांनी करून दिली प्रमोद महाजनांची आठवण

अश्लील चित्रपट रॅकेट प्रकरणात राज कुंद्राला न्यायालयाकडून जामीन मंजूर

ठरलं तर! काँग्रेसकडून रजनी पाटील यांना राज्यसभेची उमेदवारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More