बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

”माझी पत्नी अंघोळच करत नाही, मला घटस्फोट हवा”

लखनऊ | लखनऊमधील एका घटनेनं सर्वांना हैराण केलं आहे. अनेक कारणांमुळे पती-पत्नी एकमेकांपासून विभक्त होतात. मात्र एका दाम्पत्याचं घटस्फोट घेण्यामागच्या कारणाने सर्वांना थक्क केलं आहे. या प्रकरणाची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

अलिगड येथील दाम्पत्याचा पाच वर्षांपुर्वी विवाह झाला होता. काही काळानंतर दोघांमध्ये वाद होऊ लागले. अशातच त्यांना नऊ महिने आधी पुत्रप्राप्ती झाली. यानंतर दोघांमध्ये सर्व काही नीट होण्याची शक्यता वाटू लागली होती.

यादरम्यान, पत्नी अंघोळ करत नसल्याने त्याला घटस्फोट हवा असल्याची मागणी एका पतीने केली होती. मात्र केस दाखल न झाल्याने हे प्रकरण आता वुमन प्रोटेक्शन सेलकडे गेलं आहे. काऊन्सलिंगवेळी देखील पत्नी आंघोळ करत नसल्याने दुर्गंध येत असल्याचं पतीने सांगितलं.

दरम्यान, दोघांनाही काऊन्सेलरने समजवण्याचा भरपूर प्रयत्न केला. मात्र तरी देखील पतीने त्याला घटस्फोट हवा असल्याची मागणी केली. त्यासोबतच आपल्यावर लावण्यात आलेले आरोप सर्व खोटं असल्याचं म्हणत पती आपल्याला त्रास देत असल्याचं पत्नीने म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या-

येत्या 24 तासांमध्ये मुंबई पोलिसांनी माझी माफी मागावी- किरीट सोमय्या

“किरीट सोमय्या हे माझी बदनामी करण्याचं काम करत आहेत”

“संजय राऊत माझे मित्र आहेत, त्यांनी मानहानीची किंमत थोडी वाढवावी”

उत्तर प्रदेशात राष्ट्रपती राजवट लागू करावी- नाना पटोले

ओबीसी आरक्षणावरुन पडळकरांचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल, म्हणतात…

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More