बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

माझी बायको कधीही खोटं बोलत नाही; नवज्योत सिंग सिद्धूंचा पत्नीला पाठिंबा

चंदीगड | काँग्रेसचे नेते नवज्योत सिंग सिद्धू यांनी त्यांच्या पत्नीने पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे प्रभारी अमरिंदर सिंग यांच्यावर केलेल्या आरोपाचं समर्थन केलं आहे.

माझी बायको कधीच खोटं बोलत नाही. ती नैतिकतेनं मजबूत आहे, असं म्हणत सिद्धूंनी आपली पत्नी नवजोत कौर सिद्धू यांनी केलेल्या आरोपाचं समर्थन केलं आहे.

नवजोत कौर सिद्धू यांना अमृतसर आणि भटिंडा या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढण्याचा आग्रह केला होता. पण त्यांना तिकीट देण्यास नकार दिला. याबाबत माझी कोणतीच भूमिका नाही कारण तिकीट वाटपाचं काम काँग्रेस हायकमांड करते, असंही सिद्धूंनी स्पष्टपणे सांगितलं.

अमरिंदर सिंग आणि काँग्रेस नेत्या आशा कुमारी यांच्यावर अमृतसरमधून तिकीट न दिल्याचे आरोप नवजोत कौर सिद्धू यांनी केले आहेत.

महत्वाच्या बातम्या

-…बरं झालं भाजप मला देशभक्त मानत नाही- कन्हैया कुमार

-कोणत्याही परिस्थितीत राज ठाकरेंना आघाडीत येऊ देणार नाही- संजय निरुपम

-‘द वायर’ला राहुल गांधींची खास मुलाखत… काँग्रेस स्वबळावर सरकार स्थापन करेल?? राहुल म्हणतात…

-हे सरकार अटींचे आहे, कोणतही काम नाही; दुष्काळाच्या मुद्द्यावरून अजित पवारांची टीका

-प्रज्ञा ठाकूरच्या मुखातून भाजपा, संघ, अमित शाह आणि मोदी स्वत: बोलत आहेत- काँग्रेस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More