बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“इथे माझा संसार थाटत नाही आणि लोकांचे घटस्फोट होत आहेत”

मुंबई | अभिनेता अमिर खान आणि किरण राव हे दोघे आज विभक्त झाले आहेत. चाहत्यांना या दोघांच्या घटस्फोटाच्या बातमीने मोठा धक्काच बसला आहे. या दोघांनीही अधिकृतरित्या आज विभक्त झाल्याची बातमी दिली आहे. अमिर खान आणि किरण रावच्या घटस्फोटानंतर आता राखी सावंतने यावर प्रतिक्रिया दिली आहे.

जेव्हा कोणी विभक्त होतं तेव्हा मला खूप वाईट वाटतं. मला विश्वासंच बसत नाही की हे दोघे खरंच विभक्त झाले आहेत. अमिरजी कृपया घटस्फोट नका करु, असं राखी सावंतने माध्यमांशी बोलताना म्हटलं आहे. तसेच राखीने यावेळी मिश्किलपणे अमिर खान यांना लग्नाची मागणी देखील घातली आहे.

इथे माझा संसार थाटत नाही आणि लोकांचे घटस्फोट होत आहेत. अमिरजी मी अद्याप कुमारी आहे, माझ्याविषयी तुमचा काय विचार आहे, असा सवाल करत राखीने अमिर खानला मिश्किलपणे लग्नाची मागणी घातली आहे.

दरम्यान,  अमिर आणि किरण यांनी एक जॉइंट स्टेटमेंट जारी करत त्यांच्या घटस्फोटाविषयी माहिती दिली आहे. दोघांनी एकमेकांच्या समहमतीने घटस्फोट घेत असल्याचं जाहीर केलं आहे. किरण रावसह आमिर खानचं दुसरं लग्न होतं. घटस्फोट नेमका कोणत्या कारणामुळे झाला हे कारण समोर आलेलं नाही.

थोडक्यात बातम्या – 

“सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर प्रश्नांना यश येतं”

पुणे कोरोनामुक्तीकडे! कोरोनाच्या घटत्या रूग्णसंख्येमुळे पुण्यातील ‘हे’ जम्बो कोव्हिड सेंटर बंद

पोलीस विभागाबाबत महत्त्वाची बातमी! ‘पोलीस शिपाईही होणार पीएसआय’, गृहमंत्री वळसे-पाटलांचा प्रस्ताव

“राज्य सरकार वारकऱ्यांना देखील सोडत नाही, त्यांचीही मुस्कटदाबी करत आहे”

एक आजार ज्यामुळे आपलं होत आहे दगडात रुपांतर , ‘या’ चिमुकलीचं शरीर झालं दगडागत!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More