बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

म्युकरमायकोसिस हा रोग चिकनमुळे पसरतोय?; जाणून घ्या व्हायरल मेसेजमागचं सत्य

नवी दिल्ली | देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला असतानाच आता काळी बुरशी म्हणजेच म्युकरमायकोसिस या रोगाने डोकं वर काढलं आहे. देशातील विविध भागांमध्ये या रोगाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळत असल्याने हा चिंतेचा विषय बनला आहे. त्यातच सोशल मीडियावर अनेक वेगवेगळे तर्क लावणारे मेसेजेस व्हायरल होत आहेत.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या मेसेजपैकी एका मेसेजमध्ये गेल्या काही दिवसांपासून चिकनमुळे ब्लॅक फंगसचा धोका वाढतोय आणि तो आणखी वेगाने पसरत जातोय, असा दावा करण्यात आला होता. तसेच पंजाब सरकारने पोल्ट्री फार्मला ‘ईन्फेक्टेड एरिया’ घोषित केला आहे. अशा देखील चर्चा मोठ्या प्रमाणात सुरु झाल्या.

सोशल मीडियावर फिरणाऱ्या या मेसेजमुळे अनेकांच्या मनात संभ्रम निर्माण झाला. तसेच या मेसेजमध्ये चिकन खाऊ नका, त्यामुळे ब्लॅक फंगस पसरतोय अशा प्रकारची माहिती देखील पसरविण्यात आली होती. यासंबंधी प्रेस इन्फर्मेशन ब्यूरोच्या टीमने फॅक्ट चेक करून या मेसेजमागचं सत्य समोर आणलं आहे. चिकनचा ब्लॅक फंगस या आजाराशी कोणत्याही प्रकारचा संबंध नाही. तसेच पोल्ट्री फार्मशी हा संबंध जोडणे चुकीचे आहे, असं स्पष्टीकरण टीमने दिलं आहे.

सदरील व्हायरल होत असलेला मेसेज हा पूर्णपणे चुकीचा असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे नागरिकांनी अशा कोणत्याही व्हायरल मेसेजवर पडताळणी केल्याशिवाय विश्वास ठेवू नये, असं आवाहन करण्यात येत आहे.

थोडक्यात बातम्या –

दिलासादायक! महाराष्ट्रातील नव्या कोरोनाबाधितांसह सक्रिय रूग्णसंख्येत लक्षणीय घट

रितेश देशमुखनं मुलासाठी गायली अंगाई, पाहा बाप-लेकाचा क्युट व्हिडीओ

दिलासादायक! मुंबईची कोरोनामुक्तीकडे वाटचाल; सक्रिय रूग्णसंख्येसह नव्या बाधितांच्या संख्येत लक्षणीय घट

दारूसाठी काय पण! जिवाचा आटापिटा करत वाचवली दारू, व्हिडीओ व्हायरल

पुण्यात नव्या कोरोनाबाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांची संख्या वाढतेय, वाचा आजची आकडेवारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More