Top News

चंद्राबाबू नायडूंनी 24 तासात दुसऱ्यांदा घेतली शरद पवारांची भेट! हालचालींना जोरदार वेग

नवी दिल्ली |  लोकसभा निकालाला अवघे काही तास उरले असताना आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी 24 तासांत दुसऱ्यांदा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतलीय. ‘6 जनपथ’ या पवारांच्या निवासस्थानी ही भेट झालीये.

शुक्रवारी नायडूंनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, माकपचे नेते सिताराम येचुरी तर शनिवारी सकाळच्या सत्रात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि दुपारच्या सत्रात अखिलेश-मायावती यांची लखनऊला जाऊन भेट घेतली. तर ममता बॅनर्जींचीही त्यांनी भेटीसाठी वेळ मागितली होती पण ममतांनी नंतर बोलूया… म्हणत ही भेट पुढे ढकलली.

काल नायडूंनी विरोधी पक्षातल्या जवळपास सगळ्या दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्या. या सगळ्या नेत्यांचं म्हणणं ते आज शरद पवारांसमोर मांडू शकतात, असा अंदाज व्यक्त होत आहे.

दरम्यान, शरद पवार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या खासदारांची संख्या जरी जास्त नसली तरी त्यांचा एकूण राजकीय अनुभव पाहता भाजप जर बहुमतापासून दूर राहिली तर सत्तास्थापनेसाठी हे दोन नेते महत्वपूर्ण भूमिका बजावतील, यात कुठलीच शंका नाही.

महत्वाच्या बातम्या

-महत्वाच्या क्षणी सोनिया ‘फ्रंटफूट’वर! या पक्षाने काँग्रेसला दिला निकालाआधी पाठिंबा

-मोदींनी ध्यानधारणा केलेल्या गुहेत राहण्यासाठी तुम्हीही करु शकता बुकींग; त्यासाठी मोजावे लागतील ‘एवढे’ पैसे!

-राजधानी दिल्लीतील लोकसभेच्या जागांसंदर्भात अरविंद केजरीवाल यांचं मोठं वक्तव्य

मोदी-ममता संघर्ष अजूनही सुरूच; मोदींच्या दौऱ्यातून आचारसंहिता भंगाचा तृणमूलचा आरोप

-चंद्राबाबू नायडू आणि तुमच्यात काय बोलणं झालं?? पवार म्हणतात…

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या