बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

नायडूंनी लावलाय भेटींचा धडाका; पवारांनंतर आता या दिग्गज नेत्यांच्याही घेणार भेटी

नवी दिल्ली | आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री आणि तेलगू देसमचे अध्यक्ष चंद्राबाबू नायडू यांनी लोकसभा निकालाआधीच विरोधी पक्षांची एकजूट करायला आणि त्यांची मोट बांधायला सुरूवात केली आहे. आजच्या दिवशी त्यांनी दिग्गज नेत्यांच्या भेटी घेतल्या आहेत. तर काही भेटी ते संध्याकाळी घेणार आहेत.

नायडूंनी आज सकाळीच काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांची भेट घेतली आहे. आणि आगामी राजकीय परिस्थितीवर चर्चा केली आहे. त्यानंतर त्यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची ‘6 जनपथ’ या त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली.

आज (शनिवार) संध्याकाळी ते बसपा प्रमुख मायावती आणि सपाचे नेते अखिलेश यांची भेट घेणार आहेत.

दरम्यान, उद्या शेवटच्या टप्प्यातील निवडणूक पार पडत आहे. त्याअगोदरच विरोधी पक्ष संभाव्य निकाल लक्षात घेऊन तयारीला लागल्याचं दिसून येत आहे.

महत्वाच्या बातम्या

-मोदी-शहांची दादागिरी चालते, मग ममतांनी केली तर काय बिघडलं?- राज ठाकरे

-उत्तर प्रदेशची ‘कमान’ एकट्या प्रियांकांनी सांभाळली! राहुल गांधींवर प्रियांका पडल्या भारी

-“निवडणुकीत हरलो तर अमित शहा जबाबदार… हेच मोदींना दाखवायचे होते”

-टाईम मासिकात मोदींचा ‘डिव्हायडर इन चिफ’ उल्लेख; त्यावर मोदी म्हणतात…

-निकालाआधी हाचचालींना वेग, चंद्राबाबू नायडूंनी घेतली शरद पवारांची भेट; प्लॅन ठरला??

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More