नवी दिल्ली | अर्जेंटिना टीमचा कॅप्टन आणि महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सी हा त्याच्या खेळामुळे फुटबॉल चाहत्यांच्या गळ्यातील ताईत आहे. मेस्सी हा लक्झरिअस आयुष्य जगतो.
मेस्सीकडे जगभरात 23 मिलियन पौंड किमतीची आलिशान घरं आहेत. यातलं एक घर स्पेनमधल्या ‘गावा’ या शहरात आहे.
मेस्सीच्या आलिशान घरांची एकूण किंमत 234 कोटी आहे. त्यांची एकूण संपत्ती सुमारे रु.3268 आहे. तो जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या टॉप-5 खेळाडूंमध्ये राहतो.
मेस्सीचे सर्वात महागडे आणि आलिशान घर स्पेनजवळील इबिझा बेटावर आहे. त्याची किंमत 100 कोटींच्या जवळपास आहे.
मेस्सीचा जवळपास 56 कोटींचा बंगलाही बार्सिलोनामध्ये आहे. तो तिथे राहतो. विशेष बाब म्हणजे मेस्सीची पत्नी आणि तिन्ही मुलेही या बंगल्यात जास्तीत जास्त वेळ घालवतात.
दरम्यान, सध्या कतारमध्ये फिफा वर्ल्ड कपचा थरार सुरू आहे. फुटबॉल चाहते सध्या अर्जेंटिना टीमचा कॅप्टन आणि महान फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीच्या जादुई खेळाचा आनंद घेत आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-