Top News महाराष्ट्र मुंबई

ब्रिटनमध्ये आलेल्या नव्या कोरोनाचे रूग्ण आढळले महाराष्ट्रात, आरोग्यमंत्र्यांनी दिली माहिती

मुंबई | ब्रिटनमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना व्हायरसने आधीच जगाला धडकी बसली आहे. अशातच राज्यात या नव्या कोरोना व्हायरसचे म्हणजेच स्ट्रेनचे रूग्ण आढळले आहेत.

ब्रिटनमधून परतलेल्या महाराष्ट्रातील 8 प्रवाशांमध्ये नवीन कोरोनाची लक्षणे आढळून आली आहेत. यामध्ये मुंबईतील 5, पुणे, ठाणे आणि मीरा भाईंदर मधील प्रत्येकी एक जणांचा समावेश असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे.

लक्षणे आछळून आलेल्यांना विलगीकरणात ठेवलं असून त्यांचे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू असल्याचं राजेश टोपे यांनी ,सांगितलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट करत माहिती दिली आहे.

दरम्यान, कोरोनाच्या नव्या विषाणूचा देशात आजवर 38 लोकांना संसर्ग झाला आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी दिली होती.

 

थोडक्यात बातम्या-

“कंगणा राणावतने भाजपला खुश करण्यासाठी महाराष्ट्राची बदनामी केली”

DYSP पैलवान राहुल आवारेने आपले गुरू काका पवारांच्या लेकीला बनवलं जीवनसाथी

काँग्रेसनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचाही औरंगाबादच्या नामांतरला विरोध

“राजकारणात येण्यासाठी दबाव टाकल्याने सौरव गांगुलीला हृदयविकाराचा झटका”

“भाजपने नाक घासून महाराष्ट्राची माफी मागितली तरी ‘या’ पापातून मुक्ती मिळणार नाही”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या