मुंबई | मुख्यमंत्री एकनाथ शिंदे(CM Eknath shinde) हे मुख्यमंत्री होण्यापूर्वी शिवसेनेच्या(shivsena) काही आमदारांसह बंड करत घेऊन काही दिवसांपूर्वी गुवाहटीला गेले हाते. त्यावेळेसपासून ठाकरे आणि शिंदे हे दोन गट आपल्याला पाहायला मिळत आहेत. तेव्हापासून शिवसेनेचे अनेक आमदार, खासदार, आजी-माजी नगरसेवक, जिल्हाप्रमुख हे शिंदे गटात सामील झाले आहेत. त्यामुळे खरी शिवसेना कोणाची, यावर अनेक वाद चालू आहेत. हा वाद आता कोर्टात पोहोचला आहे. त्यात आता ठाकरेंना अजून एक मोठा धक्का बसला आहे.
उद्धव ठाकरेंचे(Uddhav thackray) पुतणे निहार ठाकरेंनी (Nihar thackeray)आता शिंदे गटाला पाठिंबा दिला आहे. निहार ठाकरे यापूर्वी राजकरणात सक्रिय नव्हते. परंतु शिंदे गटातून ते आपली राजकीय कारकिर्द सुरू करणार आहेत. माजी मंत्री उदय सामंत (uday samant)यांच्या नेतृत्वाखाली हा प्रवेश घडून आला आहे.
निहार ठाकरे हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. बाळासाहेब ठाकरे यांचे बिंदूमाधव ठाकरे पुत्र होते. परंतु बिंदूमाधव ठाकरेंचा अपघाती मृत्यू झाला होता. त्या बिंदूमाधव ठाकरेंचे पुत्र निहार ठाकरे आहेत. ते माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांचे जावई आहेत. हर्षवर्धन पाटील(harshvardhan Patil) यांची मुलगी आणि निहार ठाकरेंची पत्नी अंकिता पाटील-ठाकरे(Ankita Patil) या देखील राजकारणात सक्रिय असतात.
निहार ठाकरेंनी शिंदे गटात सहभागी झाल्याने ठाकरे कु़टुंबीयांचा वाद चवाट्यावर आला आहे. पेशाने वकील असलेले निहार ठाकरे राजकारणात आल्याने आता शिंदे गट त्यांच्यावर काय जबाबदारी टाकणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
थोडक्यात बातम्या-
“उंटावरून शेळ्या हाकणाऱ्यांना सामान्यांच्या समस्या कशा समजणार?”
खासदार नवनीत राणांच्या जीवाला धोका?, ‘त्या’ निनावी पत्रामुळे खळबळ
‘आम्ही तहान लागल्यावर विहीर खोदत नाही’,अजित पवारांचा शिंदे सरकारवर प्रहार
‘…त्यामुळे एकनाथ शिंदेंवर टीका करण्यासारखं काही नाही’ -संजय राऊत
“मुख्यमंत्री माझ्या पक्षात आले तर आनंद, मी टेबलावर उभा राहून स्वागत करेन”
Comments are closed.