बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

डोक्यात कुऱ्हाड घालून वहिनीने नणंदेची केली हत्या, कारण ऐकून तुम्हालाही बसेल घक्का

जयपूर | राजस्थानमध्ये अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेनंतर संपुर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. चूक असल्यावर नणंदेने अडवल्यामुळे आरोपी महिलेने आपल्याच नणंदेची कुऱ्हाडीने वार करुन हत्या केली आहे. संबंधित आरोपी महिलेला पोलिसांनी अटक केली आहे.

मृत महिलेचं नाव रेखा असून जोधपूरच्या जवळील बाधिया गावात ती आपल्या मुलीसोबत राहत होती. मृत रेखा जवळपास मजुरीची कामं करायची. घटनेच्या दोन दिवसांपूर्वी रेखाची वहिनी असलेली पुजा तिला भेटायला आली होती. पुजा रेखाच्या घरी आल्यानंतर कोणाशी तरी फोनवर बोलत होती. त्यावर रेखानं तिला फोनवर बोलण्यापासून अडवलं आणि भावाला याबाबत सांगण्याची धमकी दिली. यावरुन दोघींमध्ये वाद वाढला आणि पुजानं कुऱ्हाडीनं रेखाच्या डोक्यावर वार करत तिची हत्या केली.

ही घटना पहाटेच्या सुमारास घडली. घरात कूलर सुरू असल्यामुळे रेखाचा आवाज आला नाही. घटनेनंतर आरोपी पुजाने रेखाचा मृतदेह घरातील एका लोखंडी पेटीमध्ये भरला आणि त्यावर रोजप्रमाणे अंथरुन ठेवून दिले. यावेळी रेखाची लहान मुलगी घरातच होती मात्र तिला काहीही कळलं नाही. पुजानं रेखाला तिची आई कामासाठी बाहेर गेल्याचं सांगितलं. ही घटना 14 एप्रिलला पहाटे घडली असून 15 एप्रिलला जेव्हा रेखाची मुलगी लोखंडी पेटीवर अंथरूण ठेवायला गेली, त्यावेळी तिला यातून दुर्गंधी आली. त्यानंतर ही पेटी उघडली तर सर्व प्रकार समोर आला.

दरम्यान, पोलिसांनी रेखाची वहिणी पुजाला ताब्यात घेत चौकशी केली. त्यानंतर तिनं पोलिसांसमोर लगेचच गुन्हा मान्य केला. मृत रेखा ही वहिनी पुजाच्या चारित्र्यावर संशय घेत होती. या कारणावरुन त्यांच्यात वाद वाढले, हे देखील पोलिस तपासात समोर आलं आहे. त्यामुळं आपलं लग्न मोडेल आणि पती आपल्याला सोडेल या भीतीनं पुजानं रेखाची हत्या केल्याचं तिनं स्पष्ट केलं आहे.

थोडक्यात बातम्या-

“दिल्लीची हुजरेगिरी करून महाराष्ट्राची बदनामी करणारे हे मंत्री आपल्या काय कामाचे?”

“देशाला माझी गरज आहे, मला दारू आणायला जाऊ द्या”

“रेमडेसिवीरची साठेबाजी करणाऱ्याचं फडणवीसांनी वकीलपत्रं घेतलंय का?”

कुऱ्हाडीने वार करत अल्पवयीन मुलाने केली वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आलं समोर

रेमडेसिविरच्या बाटल्यांमध्ये पॅरासिटीमोल भरून विक्री; बारामतीतील धक्कादायक प्रकार

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More