नाशिक | कोरोनाने सर्व जगभरात हैदोस घातला आहे. सर्व देशात लॉकडाऊनच्या सूचना केल्या आहेत. मात्र तरीही काहीजण नियमांचं उल्लंघन कताना दिसत आहेत. नाशिकमध्ये देखील असे प्रकार पाहायला मिळाले. यामुळे नाशिक पोलिसांनी एक नामी शक्कल लढवली आहे. एक स्किम आणली आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.
नाशिक पोलिसांची नवी स्कीम…जर तुमचे सुंदर वाहन आता बिनकामाचे रस्त्यावर दिसले तर पुढील तीन महिने पोलिस ते वाहन सन्मानाने त्यांच्या शोरुम मध्ये ठेवतील. मग तुम्ही फक्त लांबून वाहन बघू शकाल. इच्छा असेल तर स्कीम चा लाभ घ्या, असं ट्विट नाशिक पोलिसांनी केलं आहे.
लॉकडाऊनच्या सूचना देऊनही विनाकारण काही लोक रस्त्यावर वाहन घेऊन येत आहेत. पोलिसांनी अडवल्यावर त्यांच्याशी हुज्जत घालत त्यांना उडवाउडीची उत्तरे देत आहेत. त्यामुळे नाशिक पोलिसांनी नामी शक्कल लढवली आहे.
दरम्यान, लॉकडाऊनसारख्या कठोर निर्णयांबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशाची माफी मागितली आहे. मन की बातमध्ये बोलताना त्यांनी सर्व देशवासीयांची माफी मागितली आहे.
नाशिक पोलिसांची नवी स्कीम…
जर तुमचे सुंदर वाहन आता बिनकामाचे रस्त्यावर दिसले तर पुढील तीन महिने पोलिस ते वाहन सन्मानाने त्यांच्या शोरुम मध्ये ठेवतील..
मग तुम्ही फक्त लांबून वाहन बघू शकाल..
इच्छा असेल तर स्कीम चा लाभ घ्या— Nashik City Police (@nashikpolice) March 29, 2020
ट्रेंडिंग बातम्या-
लॉकडाऊनसारख्या कठोर निर्णयांबाबत देशाची माफी मागतो- पंतप्रधान
रैना झाला सर्वात मोठा दिलदार! सर्वात जास्त रक्कम कोरोना बाधीतांसाठी दान
महत्वाच्या बातम्या-
रैना झाला सर्वात मोठा दिलदार! सर्वात जास्त रक्कम कोरोना बाधीतांसाठी दान
कोरोनामुळे ‘गोकुळ’ तोट्यात; घेतला ‘हा’ निर्णय
“मुस्लीम बांधवांनी सामुदायिक नमाजचा अट्टाहास टाळावा”
Comments are closed.