11 हजार नाभिक स्वतःचे केस मुख्यमंत्र्यांना देणार!

बुलडाणा | नागपुरातील हिवाळी अधिवेशनात नाभिक समाजातील 11 हजार लोक मुंडन केलेले केस मुख्यमंत्र्यांना देणार आहेत. त्याचबरोबर उद्यापासून मुख्यमंत्री जिथं जातील तिथं काळे झेंडे दाखवून निषेध करणार आहेत. महाराष्ट्र नाभिक महामंडळाच्या राज्यस्तरीय बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.

बुलडाण्यातील देऊळगाव राजा येथे महाराष्ट्र नाभिक महामंडळाची बैठक पार पडली. त्यामध्ये राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दिला.

दरम्यान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाभिक समाजाबद्दल काढलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याबद्दल राज्यभरातून वेगवेगळ्या प्रकारे निषेध व्यक्त केला जात आहे.