नागालँडमध्ये आता विरोधकच नसणार; राष्ट्रवादीनेही दिली भाजपला साथ

नवी दिल्ली | महाराष्ट्रात आणि देशाच्या राजकारणात राष्ट्रवादी काँग्रेस (Ncp) भाजपचा कट्टर विरोधक मानला जात असला तरी नागालँडमध्ये मात्र राष्ट्रवादीने भाजपसोबत जाण्याचा निर्णय घेतला आहे.

राष्ट्रवादी आणि जेडीयूनेही भाजप (Bjp) आघाडीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे. कोणत्याही अटीशिवाय हा पाठिंबा देण्यात आला आहे. त्यामुळे राज्यात जिंकलेल्या सर्व पक्षांचं सरकार येणार आहे. 

विधानसभा निवडणुकीत भाजप आणि एनडीपीपी सर्वात मोठे पक्ष ठरले आहेत. यावेळी राज्यात सर्वपक्षीय सरकार स्थापन केलं जाणार आहे. म्हणजे राज्यात कोणताही विरोधी पक्ष नसेल. 

दरम्यान, 2 मार्च रोजी विधानसभा निवडणुकीचे निकाल लागले. 60 सदस्य असलेल्या विधानसभेत एनडीपीपीने सर्वाधिक 25 जागा जिंकल्या आहेत. त्याखालोखाल भाजपने 12, रिपब्लिकन पक्षाने दोन, राष्ट्रवादीने 7 आणि नॅशनल पिपल्स पार्टीने 5 जागा जिंकल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More