नागपूर | स्मार्ट सिटीचे सीईओपद बळकावल्याचा आरोप करत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांची केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे. या आरोपांवर आता मुंढे यांनी मौन सोडलं आहे. आयुक्त मुंढे यांनी या संदर्भात एक पत्रक काढून भूमिका स्पष्ट केली आहे.
मी नागपूरमध्ये मनपा आयुक्त म्हणून 28 जानेवारी 2020 रोजी रुजू झालो. मनपा आयुक्त हे स्मार्ट सिटीचे पदसिध्द संचालक असतात. रामनाथ सोनावणे हे स्मार्टसिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते. त्यांनी 11 फेब्रुवारी 2020 रोजी या पदाचा राजीनामा नागपूर स्मार्टसिटीचे चेअरमन प्रविणसिंह परदेशी यांच्याकडे सुपूर्द केला. त्यानंतर परदेशी यांनी मला स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कार्यभार सांभाळण्याचे मोबाईलवर निर्देश दिले. त्यानुसार आणि शासन निर्णयानुसार आजपर्यंत मी या पदाचा कार्यभार सांभाळत आहे, असं तुकाराम मुंढे यांनी सांगितलं आहे.
स्मार्टसिटीचा सीईओपदाचा कार्यभार सांभाळतांना मी दैनंदिन कामकाज पार पाडीत आहे. या कालावधीत ट्रान्सफर स्टेशनचे टेंडर रद्द करून बायो मायनिंगचे टेंडर जाहीर केले होते. याबाबत चेअरमन परदेशी यांच्याशी चर्चा करूनच निर्णय घेण्यात आला होता. तसेच हे जाहीर झालेले बायो मायनिंगचे टेंडर अजूनही अंतिम झालेले नाही. या दोन्ही बाबी संचालक मंडळाच्या प्रस्तावित बैठकीत ठेवण्यात येणार आहेत, असंही मुंढेंनी सांगितलं आहे.
या काळात कार्यालयीन खर्च आणि वेतनाच्या देयकांशिवाय केवळ एकच चालू बील देण्यात आले आहे. हे बील यापूर्वीच मंजूर केलेल्या कामाचे आणि करार झालेल्या कंत्राटदराचे, त्यांनी केलेल्या कामाचेच आहे. यामध्ये कोणतीही आर्थिक अनियमितता झालेली नाही. संचालक मंडळाची बैठक कोरोनामुळे होऊ शकलेली नाही, ही बैठक प्रस्तावित आहे, असा खुलासा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केलाय.
ट्रेंडिंग बातम्या-
“सर्व मंत्र्यांचा ब्रेन लॉक झालाय, भाजपचं सरकार असतं तर कोरोनाबाबत अशी परिस्थिती उद्भवली नसती”
लिओनेल मेस्सीचा आणखी एक विक्रम, कारकिर्दीत 700 व्या गोलची नोंद
महत्वाच्या बातम्या-
“सैनिकांनी सांडलेल्या रक्ताचा बदला सरकारनं डिजीटल पद्धतीनं घेतला”
मुंबईकरांनो…सलूनमध्ये चाललाय?, तर आधी ‘ही’ नियमावली जरूर वाचा…
कोरोनाचा धुमाकूळ कायम असताना ‘या’ राज्यानं घेतला शाळा सुरू करण्याचा निर्णय!
Comments are closed.