पुणे महाराष्ट्र

सरपंच निवडीच्या राज्य सरकारच्या निर्णयाला थोरातांच्याच गावात विरोध

Loading...

संगमनेर | राज्यातील तात्कालीन भाजप सरकारने जनतेतून सरपंच निवड करण्याच्या निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात सरकारने रद्द केला. ग्रामपंचायत सदस्यांमधूनच सरपंचाची निवड करण्याचा निर्णय नव्या सरकारने घेतला असून सरकारच्या या निर्णयाला महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या जोर्वे गावातूनच विरोध करण्यात आला आहे.

जोर्वे गावातील ग्रामसभेत या निर्णयाला विरोध करणारा ठराव करण्यात आला असून जनतेतूनच सरपंच निवड करण्याची मागणी करण्यात आली असल्याची माहिती मिळत आहे. जोर्वे गावची ग्रामसभा नुकतीच संपन्न झाली.

Loading...

जोर्वे गावच्या ग्रामसभेत अनेक निर्णय घेण्यात आले. या ग्रामसभेत सरपंच निवडीबाबतही निर्णय घेण्यात आला आहे. बाबासाहेब रघुनाथ इंगळे यांनी जनतेतून थेट सरपंच ही प्रक्रिया कायम ठेवण्याचा ठराव मांडला. त्यांनी मांडलेल्या ठरावाला सर्व ग्रामसभा सदस्यांनी अनुमोदन देत पाठिंबा दिला आहे.

दरम्यान, या संदर्भात जोर्वे ग्रामपंचायतीच्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनाची प्रत मांडलेल्या ठरावासह पाठवण्यात आली.

Loading...

ट्रेंडिंग बातम्या-

इंदुरीकर महाराजांना ‘बाऊन्सर’ची सुरक्षा; वादाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी

“यूट्यूब चॅनेलवाले काड्या करतात, यांनीच मला संपवण्याचा प्रयत्न केला”

महत्वाच्या बातम्या-

Loading...

3 दिवसात अर्धा किलो वजन कमी झालं- इंदुरीकर महाराज

‘अजून निवडणुकांमधली अंगावरची हळद उतरली नाही?’; सुनील तटकरेंचा चंद्रकांत पाटलांना टोला

इंदुरीकर महाराजांना वाढता पाठिंबा; सोशल मीडियात #ISupportIndurikarMaharaj

Loading...
Loading...

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या