Top News

नगर लोकसभा जागेचं गणित काही जुळेना! राष्ट्रवादीचा प्रबळ दावा, विखे पाटील बंड करणार?

अहमदनगर |  लोकसभेची निवडणुक अगदी काही आठवड्यांवर येऊन ठेपलीय. जागावाटपाच्या चर्चा झडू लागल्या आहेत. काही जागांचा तिढा सोडवण्यात यश येतंय तर काही जागांच्या बाबतीत जोरदार घमासान पाहायला मिळतंय. अशीच हायव्होल्टेज चर्चा आहे ती नगर लोकसभा जागेची.

नगर लोकसभेची जागा ही राष्ट्रवादीकडेच राहील, अशी कणखर भूमिका राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी घेतली आहे. दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटलांचे पुत्र डॉ. सुजय विखे हे काँग्रेसकडून या जागेवर निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत.

राष्ट्रवादीची नगरमध्ये नुकतीच परिवर्तन सभा झाली. यावेळी राष्ट्रवादीने या जागेवर आपला प्रबळ दावा सांगितला आहे पण सुजय विखे यांच्या उमेदवारीचा तोडगा काढला जाईल, असंही अजित पवार म्हणाले आहेत.

सुजय विखे यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढायची तयारी केली आहे. एवढंच नाही तर त्यांनी प्रचारालाही सुरूवात केली आहे. येणाऱ्या काळात नगरमध्ये कोण लढतो? आणि कोण कुणावर भारी पडतो? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

महत्वाच्या बातम्या-

मोदींच्या ‘मन की बात’ला राहुल गांधी देणार टक्कर; घेऊन येणार ‘अपनी बात राहुल के साथ’

मराठमोळ्या स्मृती मंधानाचा ‘फोर्ब्स’ कडून गौरव

-राष्ट्रवादीचे आमदार आणि चंद्रकांत पाटलांचा एकत्रित विमानप्रवास! चर्चांना उधाण

अण्णांनी केली जग सोडून जाण्याची भाषा, गाव ढसाढसा रडलं…

-राष्ट्रीय स्वयंसेवक संघ सर्वाधिक धर्मनिरपेक्ष संघटना- राज्यपाल सी. विद्यासागर राव

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या