अहमदनगर महाराष्ट्र

ऐकावं ते नवलच!; शिर्डीत सर्व पक्षांच्या पाठिंब्यावर भाजपचा नगराध्यक्ष बिनविरोध!

शिर्डी | शिर्डी नगरपंचायतीच्या नगराध्यक्षपदी भाजपने झेंडा रोवला आहे. अवघे तीन नगरसेवक असताना शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी, मनसे आणि अपक्ष यांचा पाठींबा मिळाल्याने भाजपचे शिवाजी गोंदकर शिर्डीच्या नगराध्यक्षपदी बिनविरोध विराजमान झाले आहेत.

भाजपचे दिग्गज नेते आणि माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील समर्थक जगन्नाथ गोंदकर ‌यांनी अर्ज ‌माघारी घेतल्याने शिवाजी गोंदकर नगराध्यक्ष पदी विराजमान झालेत.

भाजपचे अवघे 3 नगरसेवक असताना, मनसेचा 1, शिवसेना 1, अपक्ष 2 आणि काँग्रेसचे 3 समर्थक शिवाजी गोंदकर यांच्यासोबत आल्याने विखे पाटील समर्थक असलेल्या जगन्नाथ गोंदकर यांना आपला अर्ज मागे घ्यावा लागला.

राधाकृष्ण विखे काँग्रेस सोडून भाजपमध्ये आल्यावरही काँग्रेसच्या‌ चिन्हावर निवडून आलेले विखे समर्थक नगरसेवक भाजपच्या पाठीशी होते.
राधाकृष्ण विखेंच्या गटातील नगरसेवकांनी भाजप उमेदवाराला पाठिंबा दिला.

महत्वाच्या बातम्या-

कोरोनाला पळवून लावण्यासाठी ‘या’ तीन गोष्टी खा; नवा निष्कर्ष आला समोर!

बाटलीबंद पाण्याची चव आता बदलणार; जाणून घ्या काय आहे कारण!

दिल्लीतील शेतकरी आंदोलकांचा मोदी सरकारला अल्टिमेटम; घेतला हा मोठा निर्णय!

राज्य सरकारच्या पाठपुराव्याला यश, मराठा आरक्षणाबाबत अशोक चव्हाणांची मोठी माहिती

गांजा ड्रग्ज नव्हे तर औषध; भारतासह 27 देशांचं समर्थन, पाकिस्तानचा मात्र विरोध!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या