नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 8 जणांचा जागीच मृत्यू

नगर-पुणे महामार्गावर भीषण अपघात; 8 जणांचा जागीच मृत्यू

अहमदनगर | खासगी बस आणि ट्रक यांच्या भीषण अपघातात 8 जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. नगर-पुणे महामार्गावरील वाडे गव्हाणजवळ पहाटे 6 वाजण्याच्या सुमारास हा दुर्दैवी अपघात झाला. 

औरंगाबादहून पुण्याला येणाऱ्या खासगी बसने उभ्या असणाऱ्या ट्रकला धडक दिल्याने हा अपघात झाला. बस चालकाचा गाडीवरचा ताबा सुटल्याने हा अपघात झाल्याचं बोललं जात आहे. 

माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहचले आणि बचावकार्यास सुरुवातही केली आहे. 

दरम्यान, या भीषण अपघातात 8 जणांचा दुर्दैवी अंत झाला असून जखमींची संख्या अद्याप स्पष्ट झाली नाही. 

महत्त्वाच्या बातम्या-

-त्या ‘सेल्फी’ साठी मी कोणाचीही माफी मागण्यास तयार- अमृता फडणवीस

-सेल्फी वादावर अमृता फडणवीस यांचं स्पष्टीकरण; वाचा काय म्हणाल्या

-धक्कादायक! दारावर पेट्रोल ओतून पत्रकाराचं घर पेटवण्याचा प्रयत्न

-आपल्या राजकीय वारसाबद्दल नितीन गडकरी म्हणाले…  

-…पण आधी मला एक किस दे, अनू मलिकने केली होती मागणी; या गायिकेचा आरोप

Google+ Linkedin