पुण्यातील ‘हा’ रस्ता बनतोय मृत्यूचा सापळा; दोन दिवसांत दोन अपघात

Road Accident

Road Accident l नगर रस्त्यावर (Nagar Road) वाघोलीत (Wagholi) दोन वेगवेगळ्या अपघातांत दोघांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी दुधाच्या टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीस्वार तरुणाचा जागीच मृत्यू झाला, तर शनिवारी सकाळी रस्ता ओलांडणाऱ्या पादचारी महिलेचा भरधाव मोटारीच्या धडकेत मृत्यू झाला.

पहिल्या घटनेत तरुणाचा मृत्यू :

पहिल्या घटनेत, आव्हाळवाडी फाट्याजवळ (Awhalwadi Phata) शुक्रवारी सायंकाळी साडेसातच्या सुमारास भरधाव दुधाच्या टँकरने दुचाकीला धडक दिली.

या दुर्घटनेत दुचाकीस्वार राहुल तुकाराम चौरे (Rahul Tukaram Choure) (वय २८, रा. जुनी सांगवी – Juni Sangvi) यांचा जागीच मृत्यू झाला, तर सहप्रवासी दुर्गेश गवळी (Durgesh Gawali) (वय २८, रा. मगरपट्टा, हडपसर – Magarpatta, Hadapsar) गंभीर जखमी झाला. टँकरचालकाविरोधात वाघोली पोलीस ठाण्यात (Wagholi Police Station) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Road Accident l दुसऱ्या घटनेत महिलेचा मृत्यू :

दुसऱ्या घटनेत, केसनंद फाटा (Kesnand Phata) येथे शनिवारी सकाळी साफसफाईचे काम झाल्यावर रस्ता ओलांडताना भरधाव मोटारीने धडक दिल्याने राधिका कृष्णा सोनवणे (Radhika Krishna Sonawane) (वय ५२) या पादचारी महिलेचा मृत्यू झाला.

मोटारचालक अजय ज्ञानेश्वर धोत्रे (Ajay Dnyaneshwar Dhotre) (वय २०, रा. सुयोगनगर, वाघोली, नगर रस्ता) याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राधिका सोनवणे या येरवडा भागात राहायला असून, एका खासगी कंपनीत सफाई कर्मचारी होत्या. त्यांचे जावई शरद भाकरे (Sharad Bhakre) (रा. भवानी पेठ – Bhavani Peth) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

News title : Nagar Road Turns Death Trap; Two Deaths in Two Days

Join WhatsApp

Join Now

अधिक चांगल्या अनुभवासाठी ही बातमी Chrome मध्ये उघडा! आपण सध्या Facebook च्या ब्राउझरमध्ये हे पेज पाहत आहात. कृपया वरच्या उजव्या कोपऱ्यातील तीन बिंदूंवर क्लिक करून Open in external browser पर्याय निवडा .