शिवरायांबद्दल अपशब्द वापरणाऱ्या छिंदमची तुरुंगातून सुटका

अहमदनगर | छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या श्रीपाद छिंदमची जामिनावर सुटका करण्यात आलीय. जिल्हा सत्र न्यायालयाने 15 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर त्याला जामीन दिला.

छिंदमने पालिकेतील एका कर्मचाऱ्याशी बोलताना शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. त्यानंतर भाजपने त्याची पक्षातून तसेच उपमहापौरपदावरुन हकालपट्टी केली होती. 

नगर कारागृहात कैद्यांनी छिंदमवर हल्ला केल्याचं वृत्त होतं. त्यानंतर त्याला नाशिकच्या कारागृहात हलवण्यात आलं होतं, मात्र सुरक्षेच्या कारणास्तव ही माहिती कुणालाच देण्यात आली नव्हती.

दरम्यान, अहमदनगर न्यायालयाच्या आदेशानंतर त्याला तुरुंगातून सोडण्यात आलाय. शिवप्रेमींच्या भीतीने तो अज्ञातस्थळी रवाना झालाय.