समंथाच्या एक्स नवऱ्याने उरकला साखरपुडा; होणाऱ्या सुनेबद्दल नागार्जुन म्हणाले, ‘खूप हॉट..’

Nagarjuna | साऊथ अभिनेत्री समंथा रुथ प्रभू हिचा एक्स नवरा अभिनेता नागा चैतन्य याने आज 8 ऑगस्टरोजी प्रसिद्ध अभिनेत्री सोभिता धुलिपालासोबत साखरपुडा केला आहे. नागार्जुन यांनीच या साखरपुड्याचे फोटो पोस्ट केले आहेत. आज हैदराबादमध्ये मोजक्या पाहुण्यांच्या उपस्थितीत नागा आणि सोभिता यांनी साखरपुडा उरकला आहे. त्यांचे फोटो आता तूफान व्हायरल झाले आहेत. मात्र, या फोटोंसोबतच नागार्जुन (Nagarjuna)आणि त्यांची होणारी सून सोभिताचा एक जुना व्हिडिओ देखील व्हायरल होत आहे.

2018 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गुदाचारी’ या चित्रपटाच्या ‘सक्सेस बॅश’मधील हा व्हिडीओ आहे. यामध्ये नागार्जुन सोभिताबद्दल बोलताना दिसून आले. मंचावर नागार्जुन यांना जेव्हा सोभिताविषयी विचारलं जातं, तेव्हा ते म्हणतात “ती खूप चांगली आहे. मी हे म्हटलं नाही पाहिजे, पण ती खरंच खूप हॉट आहे. तिच्यात असं काहीतरी नक्कीच आहे, जे इतरांना आकर्षित करतं.”

नागार्जुनने होणाऱ्या सूनेलाच म्हटलं ‘हॉट’

आता नागार्जुन आणि त्यांची होणारी सून सोभिताचा हा व्हिडिओ तूफान व्हायरल होत आहे. त्यावर नेटकरी देखील अनेक प्रतिक्रिया नोंदवत आहेत. ‘ती वयाने लहान आहे, किमान विचार करून बोला’, असं एकाने लिहिलंय. तर ‘हे शोभतं का’, असा सवाल दुसऱ्याने केलाय.

दरम्यान, नागार्जुन यांनी साखरपुड्याचे फोटो पोस्ट करत लिहिलंय, ‘नाग चैतन्य आणि सोभिता धुलिपाला यांचा साखरपुडा आज सकाळी 9.42 वाजता पार पडला. आमच्या कुटुंबात तिचं स्वागत करण्यासाठी आम्ही फारच उत्सुक आहोत. या आनंदी जोडप्याला खूप शुभेच्छा. त्यांना आयुष्यभराचं प्रेम आणि आनंद मिळो.’‘8.8.8 अनंत प्रेमाची सुरुवात’, असं (Nagarjuna)त्यांनी पुढे लिहिलंय.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचं झाला साखरपुडा

नागाच्या साखरपुड्याची बातमी समोर आल्यानंतर नागाच्या चाहत्यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आहे. मात्र, अभिनेत्री समंथाचे (Samantha) चाहते नाराज झाले आहेत. त्यांनी सोशल मीडियावर नाराजी जाहीर केली आहे. घटस्फोट होऊन तीनच वर्षे झाले, लगेच अभिनेत्याने दूसरा संसार थाटण्याचा निर्णय घेतल्याने समंथाचे चाहते संतापले आहेत.(Nagarjuna)

समंथाने नागा चैतन्य याच्याशी 29 जानेवारी 2017 रोजी साखरपुडा केला होता. त्याच वर्षी ऑक्टोबर महिन्यात दोघं लग्नबंधनात अडकले होते. दोघांनी 7 वर्षे एकमेकांना डेट केलं होतं. मात्र, त्यांचं नातं फार काळ टिकलं नाही. लग्नाच्या चार वर्षांतच दोघं विभक्त झाले.समंथा आणि नागा चैतन्य यांनी ‘ये माया चेसावे’, ‘माझीली’, ऑटोनगर सूर्या’, ‘बेबी’ आणि’मनम’ मध्ये एकत्र काम केले होते.’ये माया चेसावे’ हा समंथा रुथ प्रभूचा डेब्यू चित्रपट होता.

News Title : Nagarjuna calls hot to sobhita dhulipala

महत्त्वाच्या बातम्या-

मळमळ, थंड घाम, थकवा अशी लक्षणं दिसल्यास वेळीच व्हा सावध; अन्यथा..

“रवी राणासारखे छपरी लोक महायुतीत असतील तर आम्ही बाहेर पडू”

…यापुढे वीज बिल नाही; जाणून घ्या थकबाकी बिलाचं काय होणार?

आज नीरज चोप्रा खेळणार फायनल सामना; कुठे, किती वाजता पाहता येणार सामना?

राज्यात पावसाचा ब्रेक! ‘या’ जिल्ह्यांत मात्र धो-धो बरसणार, यलो अलर्ट जारी