पतीच्या हत्येप्रकणी सोनूच्या २० वर्षीय प्रियकराला अटक

नागपूर | पतीच्या हत्येप्रकरणी पत्नींच्याच २० वर्षीय प्रियकराला अटक करण्यात आलीय. इशांत मुनघाटे असं या आरोपीचं नाव आहे. 

४५ वर्षीय मनोज लोणकर आपली २५ वर्षीय पत्नी सोनू हिच्यापासून विभक्त राहात होते. रविवारी त्यांचं जोरदार भांडण झालं. या रागातून इशांतनं क्रॉक्रिटचा दगड मनोज यांच्या डोक्यात मारला. त्यात त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी इशांतला अटक केली असून या हत्याप्रकरणात सोनूचा सहभाग आहे का, याचा पोलीस तपास करत आहेत.

थोडक्यात बातम्या मिळवण्यासाठी आमचं फेसबुक पेज आत्ताच लाईक करा…

या बातमीवर तुमची कमेंट लिहा