बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘हा’ जिल्हा झाला कोरोनामुक्त?; आज एकाही रुग्णाचा मृत्यू नाही, तर अवघ्या 25 नव्या बाधितांची नोंद 

नागपूर | एकेकाळी कोरोनाचं हॉटस्पॉट ठरलेल्या नागपूर जिल्ह्यातून गेल्या काही दिवसांपासून दिलासादायक बातमी समोर येत आहे. नागपुरमधील कोरोना आता आटोक्यात आला आहे. गेल्या काही महिन्यांपासून नागपुरमधील कोरोना रुग्णसंख्या झपाट्याने वाढत होती आणि कोरोनामुळ मृतांच्या संख्येतही लक्षणीय वाढ झाल्याचं दिसून आलं.

नागपूर जिल्ह्यातील आजची कोरोनाची आकडेवारी ही मोठ्या प्रमाणात दिलासादायक असल्याचं पाहायला मिळत आहे. आज जिल्हाभरात कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झाला नसल्याचं प्रशासनातर्फे स्पष्ट करण्यात आलं आहे. तसेच आज नागपूर जिल्ह्यात 25 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. नागपूर जिल्ह्यातील कोरोना आटोक्यात आल्याने प्रशासनासह नागरिकांनीही सुटकेचा नि:श्वास टाकला आहे.

एकूणच महाराष्ट्रातील कोरोना गेल्या काही दिवसात आटोक्यात आला असताना नवा कोरोना विषाणू डेल्टा प्लस हा डोकं वर काढत असताना दिसून येत आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारने पुन्हा एकदा राज्यभरात निर्बंध लागू केले आहेत. नागपूर जिल्ह्यात आज 91 जणांनी कोरोनावर मात केली आहे.

नागपूर जिल्ह्यात आजपर्यंत एकूण 04 लाख 77 हजार 052 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच त्यापैकी 04 लाख 67 हजार 691 रुग्ण कोरोनामुक्त होऊन आपल्या घरी परतले आहेत. व आजपर्यंत 9025 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे.

 

थोडक्यात बातम्या – 

Shree

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More